Stamp Paper : 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी जास्त पैसे घेतात? ‘इथे’ करा तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stamp Paper) सर्वसामान्य जीवनशैलीत अनेक लोकांना भाडेकरार, खरेदीखत, प्रतिज्ञापत्र यांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते. या सरकारी करार पत्रांसाठी स्टॅम्पपेपरची गरज असते. शहरातील तहसील कार्यालय तसेच मुद्रांक विक्रेत्यांकडून स्टॅम्प पेपर खरेदी केला जातो. ज्याची शासनाने १०० रुपये किंमत निर्धारित केली आहे. मात्र गेल्या काही काळापासून असे निदर्शनास आले आहे की, शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम उकळून मुद्रांक विक्रेते सामान्यांची लूट करीत आहेत.

मुद्रांक विक्रेत्यांची मुजोरी

मुद्रांक विक्रेत्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यांच्या क्रूत्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे आणि सामान्य नागरिक तक्रार करण्यासाठी घाबरत असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. (Stamp Paper) १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर सर्रास ११० रुपयाला विकला जात आहे. दरम्यान एखाद्याने वरचे १० रुपये देणे नाकारले तर हे स्टॅम्प विक्रेते अधिकची रक्कम न दिल्यामूळे चक्क मुद्रांक नाकारत आहेत. या बाबत काही नागरिकांनी संताप व्यक्त केला असून नेमकी तक्रार कुठे करावी? याबाबत विचारणा केली आहे. तर चला याबाबत सविस्तर माहिती घेऊया.

अधिक कमिशनसाठी सामान्यांची लूट

आपल्या परिसरातील स्टॅम्पपेपर विक्रेते शासनाने निर्धारित करून दिलेल्या रकमेऐवजी जास्त रक्कम उकळून स्टॅम्प पेपरची विक्री करताना दिसत आहेत. आपण पाहिले असेल की, बहुतांश ठिकाणी स्टॅम्प पेपर खरेदी करताना आपल्याकडे आगाऊ रकमेची मागणी केली जाते. (Stamp Paper) केवळ अधिक कमिशन मिळवण्यासाठी हे लोक जास्तीच्या रकमेचे व त्या पटीतील मुद्रांक घेण्यास भाग पाडतात, असे काही नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे. परिणामी, न्यायालय, महसूल आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, जमिनीचे व्यवहार, खरेदीखत, बक्षीसपत्रे या कामांसाठी स्टॅम्प पेपर घेतेवेळी आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येऊनही नागरिक काही करू शकत नाही.

स्टॅम्प पेपरचा तुटवडा (Stamp Paper)

अनेक लोकांचे दिवसभरातील व्यवहार आणि सदनिकांच्या खरेदी विक्रीसह शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे तसेच शेतीविषयक जमिनीच्या व्यवहारांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते. ज्यामुळे शहरात स्टॅम्प पेपर्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक सेतू सुविधा केंद्रासमोर विक्रेत्यांनी स्टॅम्प पेपर संपले आहेत, असे फलक देखील लावले आहेत. त्यामुळे ज्या विक्रेत्यांकडे स्टॅम्प पेपरचा साठा आहे ते गैरफायदा घेत आहेत.

वाढीव दर

तहसील कार्यालय परिसर आणि शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे शासनाने निर्धारित करून दिलेले १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर जादा दर आकारून विकले जातात. (Stamp Paper) या मुद्रांकासाठी १०० रुपयांऐवजी ११० रुपये, २०० रुपये, २२० रुपये, ५०० रुपये, ५३० रुपये, १००० रुपये किंवा १०५० रुपये आकारले जात आहेत.

कुठे तक्रार कराल?

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून मुद्रांक विक्रेत्यांना मागणीनुसार सरकारी चलन भरून मुद्रांक दिले जातात. यामध्ये शासकीय ज्युडिशियल आणि नॉन ज्युडिशियल असे मुद्रांकाचे २ प्रकार आहेत. दरम्यान, ज्युडिशियल मुद्रांक १०० रुपये, २०० रुपये आणि ३ हजार रुपये दराचे असतात. तर नॉन ज्युडिशियल मुद्रांक १०० रुपये, ५०० रुपये, १००० रुपये, ५००० रुपये आणि १०,००० रुपये दराचे असतात. (Stamp Paper) हे मुद्रांक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना प्रत्येक मुद्रांकामागे २% ते ३% कमिशन दिले जाते. असे असूनही मुद्रांक विक्रेत्यांनी सामान्यांची लूट चालवली आहे.

यामुळे सर्व सामान्य नागरिक वैतागले आहेत. जर तुमच्यासोबत देखील असा प्रकार घडला तर तुम्ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून थेट तक्रार देऊ शकता. याशिवाय उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्याकडेही आपण तक्रार करू शकता. कारण, मुद्रांक नोंदणी उप जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार मुद्रांकांची विक्री किती रुपयांना करायला हवी? यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार असतात. त्यामुळे, जर स्टॅम्प पेपर खरेदी करतेवेळी तुमच्याकडे अधिक रकमेची मागणी केली तर तुम्ही मुद्रांक नोंदणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. (Stamp Paper)