Strange Bridge : कुछ तो गडबड है…! ‘या’ अतिशय सुंदर पुलावरून जाणे लोक करतात नापसंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Strange Bridge : जगभरात मानवनिर्मित असे अनेक पूल आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासोबतच मनोहारी दृश्य दर्शवित असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका ब्रिज बद्दल सांगणार आहोत जो अतिशय सुंदर आहे. त्यावरून जाताना तुम्हाला कधीही विसरता येणार नाहीत अशी मनोहारी दृश्य दिसतील मात्र तरीदेखील या ब्रिजचा वापर मात्र खूप कमी लोक करतात. असे का आहे ? काय आहे या ब्रिजची (Strange Bridge) खासियत ? का लोक यावरून प्रवास करीत नाहीत? चला जाणून घेऊया…

हो आज आम्ही तुम्हाला ज्या ब्रिज बद्दल सांगणार आहोत हा ब्रिज म्हणजे हाँगकाँग झुहाई मकाओ ब्रिज. हा पूल दिसायला अतिशय सुंदर असून या पूला वरून जाताना अतिशय मनमोहक असे दृश्य दिसतात. हा पूल समुद्रावर बांधला गेलेला असून जगातील सर्वात सुंदर पुलांपैकी एक असा हा पूल आहे. हॉंगकॉंग मकाऊ आणि चीन यांना जोडण्यासाठी खरंतर हा पूल बांधण्यात आला होता. याचा आकार देखील एखाद्या सापाच्या आकारासारखा आहे आणि एवढंच नाही तर हा पूल रस्ता आणि पाण्याखालील बोगद्यांमधून सुद्धा जातो. हा पूल बांधण्यासाठी तब्बल 1582 ट्रिलियन खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा पुल बांधल्यापासून खूप कमी लोक या पुलाचा वापर करतात. या तिन्ही शहरांना अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा या पुलाच्या बांधण्यामागचा उद्देश होता. मात्र तसे न होता खूप कमी लोक या पुलाचा वापर करतात

काय आहे कारण? (Strange Bridge)

  • लोक पुलाचा वापर करत नाहीत याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे परवाने घेणे. या पुलावरून प्रवास करण्यासाठी लोकांना दोन आठवड्यांच्या कागदपत्र प्रक्रियेतून जावे लागते.
  • हाँगकाँग मधून क्लोज्ड रोड परमिट, मकाऊ लायसन्स प्लेट मिळवणे आणि मकाऊ (Strange Bridge) किंवा चिनी कार विमा घेणे हा प्रवास करण्यासाठी आवश्यक आहे. आणि या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायच्या म्हटल्या तर बारा दिवस कामकाजाचे तुम्हाला द्यावे लागतील.
  • एवढे करूनही हे प्रकरण येथेच संपत नाही तर तुमच्याकडे सर्व प्रकारच्या परवानगी असल्या तरी तुम्हाला प्रवेश मिळेलच याची खात्री नाही कारण या पुलावरून दिवसाला किंवा 150 खाजगी गाड्यांना प्रवेश दिला जातो.
  • याशिवाय हॉंगकॉंग चा कायमचा रहिवासी असण्यासोबतच अर्जदार (Strange Bridge) हा मकाऊचा कर्मचारीही असणं आवश्यक आहे.
  • तसंच या पुलावरून चीनच्या दिशेने जायचं झालं तर दोन वेळा सीमा नियंत्रणातून जावे लागते या पुलाची एक लेन ही हॉंगकॉंग -मकाऊला जाते आणि दुसरी लेन ही चीनला जाते. त्यामुळे मधल्या काळात लेन बदलण्याच्या प्रक्रियेतून जावे लागते.
  • याबरोबरच पुलाची वेग मर्यादा देखील कमी आहे. त्यामुळे पुढे जाऊन मकाऊ मध्ये पोहोचला तर कार पार्क करण्यासाठी बराच वेळ लागतो.

त्यामुळे सहाजिकच एवढ्या सगळ्या कटकटी करण्यापेक्षा या पुलावरून (Strange Bridge) प्रवास करणेच लोक नापसंत करतात. आणि म्हणूनच अतिशय सुंदर असं नाही या पुलावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र खूप कमी आहे.