Stunt Video : रीलसाठी काहीपण!! उंच इमारतीवर तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी; व्हिडीओ पाहून भरेल धडकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stunt Video) आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरम्यान अनेक लोकांची सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी सुरु असलेली धडपड आणखीच वाढली आहे. तसं पाहिलं तर सोशल मीडियावर व्हायरल होणे आता कठीण राहिलेले नाही. पण इतरांपेक्षा वेगळं आणि हटके करायच्या नादात लोक असं काहीतरी करतात की अनेकदा काळजाचा ठोका चुकतो. आतापर्यंत तुम्ही कितीतरी स्टंट व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. जो पाहून कुणालाही धडकी भरेल.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक तरुण मंडळी रील व्हिडीओ बनवत असतात. कधी कॉमेडी, कधी विचित्र तर कधी स्टंट करून हे रिलस्टार नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. (Stunt Video) सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने नेटकऱ्यांचे नुसते लक्ष वेधून घेतलेले नाही तर क्षणभर का होईना हृदयाची धडधड वाढवली आहे. या व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक तरुणी रील बनवण्यासाठी चक्क उंच इमारतीवरून खाली लटकते आहे.

(Stunt Video)या व्हिडिओतील हे दृश्य पाहून अगदी अंगावर काटा येतो आहे. हे इतकं भयानक कृत्य आहे की कुणीही करायची हिंमत करू नये. या व्हिडिओत इमारतीवर असलेल्या व्यक्तीने तरुणीचा हात धरला आहे आणि ती उंचावरून खाली लटकताना दिसते आहे. अशी रील बनवताना जर या व्यक्तीचा हात सुटला असता तर…. ही नुसती कल्पना धडकी भरवणारी आहे. हा रील बनवतेवेळी ही तरुणी अक्षरशः स्वतःचा जीवासोबत खेळली आहे. मुख्य म्हणजे केवळ प्रसिद्धीपुरता या मुलीने मृत्युसोबत अशी जीवघेणी थट्टा केली आहे.

या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, ती तरुणी खूप घाबरलेली आहे. (Stunt Video) तिच्या चेहऱ्यावरील भाव तिला वाटणारी भीती स्पष्टपणे दर्शवत आहेत. यापूर्वीही असे अनेक स्टंटबाजीचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशा काही घटनांमध्ये लोकांना दुखापतही झाली आहे. तर काहींनी जीवदेखील गमावला आहे.

या तरुणीचा हा जीवघेणा व्हिडीओ सोशल मीडिया X हॅण्डलवर All things interesting नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी संताप दर्शवला आहे. तर एका नेटकऱ्याने माहिती देताना लिहिलंय, ‘ही रशियन मॉडेल आहे. तीच नाव व्हिक्टोरिया ओडिंटकोवा असून तिला यूएईमध्ये येण्यास बंदी घालण्या आली आहे. (Stunt Video)