Subodh Bhave : ‘या’ चाळिशीतल्या चोरांचा अलीबाबा कोण? सुबोध भावेच्या नव्या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Subodh Bhave) नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा मल्टिस्टारर चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. पोस्टरधील कलाकारांच्या चेहऱ्यावरील चित्रविचित्र, प्रश्नार्थक हावभाव पाहून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतोय. त्यातच लिपस्टिकचे निशाण ही उत्सुकता अधिक वाढवतेय. आता यामागचे गुपित मात्र चित्रपट आल्यावरच उलगडणार आहे.

(Subodh Bhave)या आगामी चित्रपटातून अभिनेता सुबोध भावे , मु्क्ता बर्वे, श्रृती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर अशी मातबर कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या प्रत्येक कलाकाराला आपण मुख्य भूमिकेत पाहू शकणार आहोत. अशा या सगळ्या मातब्बर कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

शिवाय या चित्रपटाचे नावच प्रचंड उत्सुकता वाढवणारे आहे. यातून विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे आणि त्यामुळे आता या चोरांना काय शिक्षा होणार? विवाहित असणे हा गुन्हा का आहे? आणि नेमके हे काय प्रकरण आहे?याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. एकंदरच चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून चोरांची ही टोळी दंगा करणार, हे निश्चित!

आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे, तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. (Subodh Bhave) दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” या चाळीशीतील चोरांनी केलेला गुन्हा जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली असेल. मात्र या गुन्ह्याची उकल चित्रपट आल्यावरच होणार आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात विनोद, धमाल, गोंधळ आणि मजा आहे.’