मुलांचे भविष्य करा सिक्युअर ; सुरक्षित गुंतवणुकीसाठी ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय

investment for kids
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकार छोट्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक योजना सुरु करत आहेत. त्यामुळे पालकांना मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे हे पर्याय मुलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पण पालकाना या विविध योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक फसू शकते . तर आज आम्ही अशा योजनांबद्दल माहिती सांगणार आहोत , ज्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि मुलांना भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींपासून वाचवाल . त्यामुळे तुम्ही केलेली छोटी बचत हि मोठी बचत ठरू शकते.

एनपीएस वात्सल्य योजनेचे

या योजनेत पालक किंवा त्यांच्या नातेवाईक मुलांसाठी बचत करू शकतात. ही योजना मुलांच्या आर्थिक भविष्याचा विचार करून सुरू केली गेली आहे. पालक या योजनेमध्ये 1000 रुपयांपासून बचत सुरू करू शकतात. ही छोटी रक्कम असली तरी, वेळोवेळी मोठा निधी जमवता येतो. एनपीएस वात्सल्य योजना ही एक मार्केट लिंक्ड योजना आहे, म्हणजेच यामध्ये केलेली गुंतवणूक शेअर बाजाराच्या स्थितीवर आधारित असते, ज्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला नफा मिळतो . तसेच गुंतवणूक करणाऱ्यांना करसवलतीचा लाभ देखील मिळतो. यामुळे पालकांची करदेयता कमी होण्यास मदत होते. मुलांच्या भविष्याशी संबंधित आर्थिक सुरक्षितता यासाठी एनपीएस वात्सल्य योजना एक उत्कृष्ट पर्याय आहे, ज्यामुळे पालक आपल्या मुलांसाठी एक मजबूत वित्तीय आधार तयार करू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना

या योजनेत खाते फक्त मुलींच्या नावावर उघडता येते. खातं उघडण्याची वयोमर्यादा 10 वर्षांपर्यंत आहे. तुम्ही एका वर्षात किमान 250 रु व जास्तीत जास्त 1.5 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकता . त्याचबरोबर तुम्हाला योजनेवर एक आकर्षक व्याज दर देखील मिळतो, जो दरवर्षी सरकारतर्फे निश्चित केला जातो. या योजनेचा कालावधी 21 वर्षे असतो, ज्यामुळे मुलीला वयाच्या 18 वर्षांनंतर या खात्यातून पैसे काढता येतात. या योजनेत योगदान करणाऱ्यांना 80C कलमाअंतर्गत कर सवलत मिळते.

म्युच्यूअल फंड

मुलांसाठी SIP योजना सुरू करणे एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो. यामध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक केली जाते, आणि ती रक्कम मुलांच्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. या योजनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मुलांच्या शिक्षण, विवाह इत्यादीसाठी पैशांची सोय होऊ शकते. तरी पालकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो .

पीपीएफ अकाऊंट

पीपीएफ (पब्लिक प्रोविडंट फंड) अकाऊंट एक सरकारी बचत योजना आहे, जी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि कर कपातीसाठी उपयुक्त आहे. या अकाऊंटमध्ये पैसे गुंतवून आपल्याला सुरक्षित आणि जास्त नफा मिळतो . पीपीएफ अकाऊंट भारतीय पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये उघडता येतो. पालक या योजनेत मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकतात आणि मुलांच्या भविष्यासाठी निधी साठवू शकतात. याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो .