Summer Holiday Destinations : उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा विकेंड ‘ही’ आहेत परफेक्ट डेस्टिनेशन्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Summer Holiday Destinations : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हंटल की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि पर्यटन या दोन गोष्टी प्रामुख्याने केल्याचं जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला थंड हवेच्या ठिकणी भेटी द्यायच्या असतील तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या खास थंड हवेच्या ठिकांणांची माहिती देणार आहोत तिथे तुम्ही यंदाच्या उन्हाळी सुट्टीत आवश्य भेटी देऊ शकता . चला तर मग जाणून घेऊया …

खंडाळा (Summer Holiday Destinations)

सह्याद्री पर्वत रांगेतील पश्चिम घाटात खंडाळा हे हिल स्टेशन आहे. पुणे जिल्ह्यातलं प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळ्यापासून (Summer Holiday Destinations) साधारण ३ किमी अंतरावर खंडाळा आहे. ट्रेकिंग साठी खंडाळा प्रसिद्ध आसूंयेथे अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. वाघदरी,अमृतांजन पॉइंट,कार्ला आणि भाजा लेणी,ड्यूक्स नोज,भिशी लेक द टॅब्लेट ऑन द वॉल ऑफ द जेल, खंडाळा ऑन वेस्टर्न घाट, टोम्बस्टोन ऑफ जेसुइट्स जर्मन प्रीस्ट, मंकी हिल, GIPR स्लीपर, द वन लेड बाय जेम्स बर्कले ॲन्ड हिज टिम ही प्रसिद्ध ठिकाणे खंडाळ्यात पाहता येतील. या ठिकाणाला भेट देण्यासाठी मे महिना उत्तम आहे.

इगतपुरी

पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये इगतपुरीचे भव्य हिल स्टेशन समाविष्ट आहे. निर्ग सौन्दर्याने भरलेले असे हे परिपूर्ण ठिकाण आहे. सुंदर धबधबे, डोंगररांगा मन मोहून टाकतील यात शंका नाही. त्रिंगलवाडी किल्ला,विहिगाव धबधबा,कळसूबाई शिखर,विपश्यना केंद्र,भावली धरण,भातसा नदीचे खोरे, सांधण व्हॅली,कसारा घाट,म्यानमार गेट,कॅमल व्हॅली,कुलंगगड ट्रेक,बितनगड ट्रेक,अमृतेश्वर मंदिर अशी ठिकाणे इगतपुरीमध्ये पाहण्यासारखी आहेत.

लोणावळा

पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. थंड हवेचे उत्तम ठिकाण आहे. लोणावळ्याच्या (Summer Holiday Destinations) चिक्की खूप प्रसिद्ध आहे. शिवाय लोणावळ्याचे भुशी धरण पावसाळी पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळयात याठिकाणी पर्यटकांची तुडुंब गर्दी होत असते. लोणावळा आणि आसपासच्या भागात राजमाची पॉईंट,टायगर पॉईंट,कार्ला लेणी,लोहगड किल्ला,भुशी धरण अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

महाबळेशवर (Summer Holiday Destinations)

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या (Summer Holiday Destinations) रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. पंचगंगा मंदिर,कृष्णाबाई मंदिर,मंकी पॉइंट,आर्थर सीट पॉइंट,वेण्णा लेक,केटस् पॉईंट,नीडल होल पॉइंट,प्रतापगड,लिंगमळा धबधबा अशी ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत आहेत. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे.