Summer Places In Maharashtra : उन्हाळ्यात फिरायला जायचंय? तर महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे अजिबात मिस करू नका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Places In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा बेक्कार वाढला आहे. घामाच्या धारांनी आणि उष्ण वाऱ्यांनी जीव नकोस केला आहे. प्रत्येक घरातील पंखे, कुलर आणि एसी एक्सट्रा ड्युटीवर आहेत. त्यात मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे अनेक सुट्टीचा बेत आखताना दिसत आहे. आता उन्हाळ्यात फिरायचं म्हणजे सूर्याची कडक किरणे झेलावी लागणार. पण, महाराष्ट्रातील या उन्हाळी पर्यटन स्थळांना भेट दिलीत तर उन्हाचा किंचितही त्रास होणार नाही. आपल्या महाराष्ट्रात शिमला, कुल्लू मनाली, दार्जिलिंगसारखी काही थंड हवेची ठिकाणे आहेत. जिथे उन्हाळ्यात भेट देणं मनाला गारवा देणार ठरेल. चला तर या ठिकाणांविषयी माहिती घेऊया.

1. माथेरान

महाराष्ट्रातील माथेरान हे अत्यंत सुंदर आणि थंड हवेचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. मुंबई शहरापासून अगदी जवळ असलेले माथेरान हे जगभरात प्रसिद्ध आहे. (Summer Places In Maharashtra) लहान असले तरीही निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असल्यामुळे उन्हाळ्यात माथेरान फिरायची मजाच काही वेगळी आहे. त्यामुळे या उन्हाळी सुट्टीत माथेरानला जायचा प्लॅन नक्की करा.

2. लोणावळा खंडाळा (Summer Places In Maharashtra)

मुंबईकरांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले लोणावळा खंडाळा उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करायला एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. शहरापासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणांना भेट दिल्यावर आपला मूड एकदा रिफ्रेश होतो. शिवाय इथले निसर्ग सौंदर्य मनाला विशेष भुरळ घालते.

3. महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा, हिरवीगार झाडी आणि थंडगार वारे असे येथील सुंदर वातावरण मनाला आल्हाददायक अनुभव देते. (Summer Places In Maharashtra) तसेच येथील नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहताना अगदी हरवून जावेसे वाटते.

4. गगनबावडा

गगनबावडा हे कोल्हापुरातील अत्यंत लोकप्रिय हिलस्टेशन आहे. येथील थंडगार वातावरण उन्हाच्या कडक झळीचा त्रास होऊन देत नाही. तसेच इथले नयनरम्य परिसर मनाला प्रसन्न करतात. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील तर हे एक चांगले स्थळ आहे.

5. भंडारदरा

महाराष्ट्रातील भंडारदरा हे देखील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. थंड हवेच्या ठिकाणांमध्ये या स्थळाचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण उन्हाळी सुट्ट्यांमध्ये न केवळ मूड रिफ्रेश करते तर मनालाही आनंद देते. (Summer Places In Maharashtra)