Summer Tourism: उन्हाळ्यात फॅमिलीसोबत सफर करायचीय? मग या 3 ठिकाणांना भेट द्याच

Summer Tourism
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Summer Tourism – उन्हाळी सुट्टीत परिवारासोबत थोडा वेळ निसर्गाच्या खुशीत घालवायचा असेल, तर राजस्थानमधील भरतपूर हे ठिकाण सर्वोत्तम ठरू शकते. ऐतिहासिक स्थळं, निसर्गाची सुंदरता आणि सांस्कृतिक वारसा एकत्रित अनुभवायचं असेल, तर भरतपूर आपल्या यादीत असायला हवं. भरतपूर हे एक अद्भुत ठिकाण आहे जे ठराविक पर्यटन स्थळांवरून अधिक चांगले आणि हटके अनुभव देतं. इथे तुम्हाला इतरत्र न दिसणारी निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक किल्ल्यांपासून विविध पक्ष्यांच्या प्रजातीपर्यंत अनेक गोष्टी पाहता येतील.

भरतपूर पक्षी अभयारण्य (Summer Tourism)

भरतपूर येथील पक्षी अभयारण्य हे देशातील प्रमुख पक्षी अभयारण्यांपैकी एक आहे. येथे 300 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. इथे तुम्हाला जंगली बदके, लाल क्रेस्टेड पक्षी, लहान बदकं अन इतर अनेक पक्षी प्राण्यांना पाहता येईल. देश-विदेशातून पर्यटक इथे येतात आणि निसर्ग प्रेमींना हे स्थान अत्यंत आकर्षक वाटते.

गंगा मंदिर –

भरतपूर येथील गंगा मंदिर एक ऐतिहासिक स्थळ आहे, जे जुन्या कारागिरीत बांधलेले आहे. या मंदिरात गंगा मातेची पांढरी संगमरवरी मूर्ती एक आकर्षक दृश्य आहे. विशेष म्हणजे, गंगा मातेची मूर्ती मगरीच्या पाठीवर बसवलेली आहे, जे पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

लोहगड किल्ला –

राजस्थानच्या प्राचीन किल्ल्यांपैकी (Summer Tourism) एक असलेला लोहगड किल्ला, त्याच्या मजबूत बांधणी आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत – दक्षिणेतील चौबरजा आणि उत्तरेतील अशिताहाटू. इथे तुम्हाला प्राचीन शस्त्रास्त्रं आणि विविध ऐतिहासिक वस्तू पाहता येतील.

उन्हाळी सुट्टीला संस्मरणीय बनवा –

राहण्यासाठी जर तुम्हालाआलिशान अनुभव हवा असेल, तर क्लब महिंद्रा भरतपूर एक उत्तम पर्याय आहे. हेरिटेज रिसॉर्ट म्हणून प्रसिद्ध असलेले, हे 40 एकरांमध्ये पसरलेले आहे. इथे प्राचीन लाकडी फर्निचर, आकर्षक पडदे आणि छान प्रकाशयोजना यामुळे तुम्हाला राजेशाही वातावरणाचा अनुभव मिळतो. अशा प्रकारे भरतपूरमध्ये तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि सांस्कृतिक अनुभव मिळवता येईल, जे तुमच्या उन्हाळी सुट्टीला (Summer Tourism) वेगळं आणि संस्मरणीय बनवेल.