Summer Yoga : उन्हाळ्यात ‘ही’ योगासने ठेवतील तुम्हाला फिट अँड फाईन; मूडही राहील फ्रेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Yoga) ऋतू कोणता आहे याचा आणि योग अभ्यास करण्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे नियमित योगा करा असे तज्ञ सांगतात. आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा अत्यंत फायदेशीर भूमिका निभावतो. त्यामुळे उन्हाळ्यात कितीही कंटाळा आला तरीही योगा करणे सोडू नका. उलट उन्हाळ्यात शरीराला आतून थंड आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी खाण्यापिण्यासोबत योगा करण्यावर भर द्या. आज आपण उन्हाळ्यात फायदेशीर ठरतील अशा सोप्या योगासन पोझेझविषयी जाणून घेणार आहोत. सोयच त्याचे फायदे देखील जाणून घेऊ.

उन्हाळ्यात ‘ही’ योगासने करा
(Summer Yoga)

1. वृक्षासन

वृक्षासन हे असं ‘ट्री पोझ’ म्हणूनदेखील ओळखले जाते. या आसनाचा नियमित अभ्यास केल्यास संपूर्ण शरीराला फायदा होतो. शरीरातील क्रियांचे संतुलन साधण्यास हे असं मदत करते. तसेच पायाचे स्नायू, आतील मांड्या मजबूत करते आणि मनाला शांती देऊन एकाग्र करते.

2. पद्मासन

पद्मासन या आसनाला ‘कमळ मुद्रा’ म्हणूनही ओळखले जाते. (Summer Yoga) आपल्या शरीराचे आधार चक्र संतुलित करून मनाला स्थिर आणि सुरक्षिततेच्या भावनांशी जोडण्याचे काम हे असं करते. यामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि मानसिक स्वास्थ्य ठीक राहते.

3. मत्स्यासन

मत्स्यासन या आसनाला ‘फिश पोझ’ म्हणून ओळखले जाते. या आसनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि यामुळे मानसिक ताण तणाव दूर राहतो. तसेच मानेच्या भागाला ताणून शरीराला आराम दिल्याने श्वासोच्छवास सुधारतो.

4. बद्धकोनासन (Summer Yoga)

बद्धकोनासन या आसनाला ‘बटरफ्लाय पोझ’ म्हणून ओळखले जाते. हा श्वासोच्छवासाचा व्यायाम असून याचा नियमित अभ्यास केल्यास पाठीचा कणा ताणण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरातील जखडलेले स्नायू मोकळे होतात.

5. सुखासन

सुखासन या आसनाला ‘सहज पोझ’ असे म्हणतात. हे असं ध्यानासाठी वापरले जाणारे सगळ्यात सोपे आसन आहे. या आसनामुळे शरीराला आराम आणि मनाला शांती मिळते. यामुळे एकाग्रता वाढते. (Summer Yoga)

6. नौकासन

नौकासन या आसनाला ‘परफेक्ट नवासन’ किंवा ‘बोट पोझ’ असे म्हणतात. यामुळे शरीर आणि मनाचा समतोल राखण्यास मदत मिळते. हे असं स्नायूंना मोकळे करते आणि तणाव दूर करते.

7. शवासन

शवासन हे असं अत्यंत सोपे आहे. यामध्ये जमिनीवर सरळ झोपावे. (Summer Yoga) यामुळे शारीरिक थकवा दूर होतो, मन शांत होते आणि मानसिक ताण दूर होतो.

8. वीरभद्रासन

वीरभद्रासन या आसनाला ‘योद्धा मुद्रा’ म्हणून ओळखले जाते. या आसनाच्या साहाय्याने ओटीपोटाच्या भागातील मुख्य स्नायू मजबूत होतात. शिवाय वजन कमी करण्यास मदत होते.

9. मार्जिरियासन

मार्जिरियासनला ‘कॅट पोज’ म्हणून ओळखले जाते. हे असं एंडोर्फिन हार्मोन्स सोडण्यास मदत करते. यामुळे चिडचिड कमी होते, मन शांत होते आणि मानेच्या भागातील स्नायूंमधला ताण दूर होतो.

10. उष्ट्रासन

उष्ट्रासन या आसनाला ‘उंटाची मुद्रा’ असे म्हणतात. हे अत्यंत शक्तिशाली आसन आहे. जे पाठीचा कडकपणा कमी करून स्नायू मोकळे करते आणि किडनीचे आरोग्य सुधारण्यासह शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. (Summer Yoga)