हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंतराळवीर सुनीता विलियम्स (Sunita Williams) अन त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यांच्या मोहिमेनंतर पृथ्वीवर आज (19 मार्च) परतल्या आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार त्यांची लँडिंग पृथ्वीवर पहाटे 3. 27 च्या सुमारास झाली. त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास हा खडतर होता , आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वरून त्यांना पृथ्वीवर येण्यासाठी 17 तासांचा कालावधी लागला. स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या साहाय्याने सुरक्षितपणे लँडिंग करण्यास यश मिळाले आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी अन अभिमानास्पद आहे.
अखेरी सुनीता विलियम्सचे पृथ्वीवर लँडिंग –
अवकाश यात्रा 18 मार्च रोजी ISS वरून सुरू झाली होती. स्पेसक्राफ्ट अवकाशात गेल्यानंतर, तापमान 1650 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते, आणि 7 मिनिटे कम्युनिकेशन बॅकआऊट देखील झाले होते. पण त्याच्या नंतर, पॅराशूटद्वारे ड्रॅगन कॅप्सूल सुरक्षितपणे समुद्रात लँड झाला. नासा अन स्पेसएक्सच्या टीमने, कॅप्सूल समुद्रात लँड झाल्यानंतर, अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढले. लँडिंगच्या वेळी नासाच्या शास्त्रज्ञांचे सर्व लक्ष या ऐतिहासिक घटनेवर होते. लँडिंग होण्यानंतर कॅप्सूलचे सिक्युरीटी चेक 10 मिनिटे चालले होते. नऊ महिन्यांहून अधिक काळ अवकाशात घालवून सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेची यशस्वी पूर्णता साधत पृथ्वीवर परतले. हा कार्यक्रम अंतराळ अन्वेषणाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा ठरला आहे.
अत्याधुनिक अंतराळ यान –
स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल हे एक अत्याधुनिक अंतराळ यान आहे, ज्याची निर्मिती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने केली आहे. या कॅप्सूलचा मुख्य उद्देश म्हणजे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेणे. याच्या कॅप्सूल आणि ट्रंकची एकूण उंची 8.1 मीटर (26.7 फूट) असून, त्याचा व्यास 4 मीटर (13 फूट) आहे. या यानात सुरक्षा फीचर्स देखील समाविष्ट आहेत, ज्यामुळे अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित केली जाते. लिफ्ट-ऑफ दरम्यान कोणत्याही बिघाडाची परिस्थिती निर्माण झाल्यास, कॅप्सूलमध्ये एक लाँच एस्केप सिस्टम (LES) आहे, ज्यामध्ये आठ सुपरड्रॅको इंजिन्स आहेत. प्रत्येक इंजिन16,000 पौंड शक्ती निर्माण करतो, जे क्रू ड्रॅगनला रॉकेटपासून तत्काळ वेगळे करून सुरक्षित अंतरावर नेऊ शकते.