Supriya Pilgaonkar : ‘मी अगदीच सुन्न झाले..’; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमावर सुप्रिया पिळगांवकरांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Supriya Pilgaonkar) सध्या सगळीकडे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून ते अगदी पोस्टर, टिझर, ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कायम राखली होती. यानंतर आता जेव्हा चित्रपटात प्रदर्शित झाला आहे तेव्हा प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा याने वीर सावरकर यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती आणि त्यांचे राजकीय, सामाजिक कार्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकाराने कसून मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे न केवळ बॉलिवूड तर मराठी सिनेविश्वातील दिग्गज मंडळीदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. अनेक प्रेक्षक आणि समीक्षकांनी दिलेल्या शाबासकी नंतर आता मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मराठी सोबत बॉलिवूड सिनेविश्वात देखील सुप्रिया यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे दिग्गजांच्या यादीत सुप्रिया पिळगांवकर यांच्या नावाचा समावेश आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. यानंतर आता लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर करत बालपणीची आठवण सांगितली आहे. यासाठी (Supriya Pilgaonkar) सुप्रिया पिळगांवकर यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचे एक पोस्टर शेअर केले आहे. सोबत एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी बालपणीचा एक खास प्रसंग सांगितला आहे.

ते पुस्तक आता पुन्हा जिवंत झालं… (Supriya Pilgaonkar)

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘मी १२ वर्षांची असताना वडिलांनी मला शाळेच्या सुट्ट्यांमध्ये एक पुस्तक वाचायला आणून दिलं होतं. ते पुस्तक अगदी जाडजूड होतं. अर्थात सुट्टी पूर्ण होईल तोपर्यंत माझं पुस्तक वाचून होईल असं वडिलांना अपेक्षित होतं. परंतु, ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण वाचून होईपर्यंत मी ते पुस्तक बाजूला ठेऊ शकले नाही. सुरुवातीला पुस्तक वाचायला घेतल्यावर अनेक अडथळे आले. मी मध्येच रडत होते, हुंदके देत होते’.

(Supriya Pilgaonkar) ‘अर्ध पुस्तक वाचल्यावर मी अगदीच सुन्न झाले होते. ते पुस्तक वीर सावरकरांच्या चित्रपटाच्या रुपात आता पुन्हा जिवंत झालं. पुस्तकाचं नाव होतं माझी जन्मठेप! तुम्ही चित्रपट पाहिलात का?’ अशाप्रकारे सुप्रिया पिळगांवकर यांनी मोजक्या शब्दात एका अनुभवाची जोड देत या सिनेमाचे कौतुक केले आहे.