हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) प्रकरण जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. गर्भवती तनिषा भिसे याना ऍडमिट करण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 10 लाख रुपये डिपॉझिटची मागणी केली होती , त्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. असा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे अख्या राज्यात मोठी खळबळ उडाली. तसेच या कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड असूनही उपचार करण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे. पण या कुटुंबावर काही टीका होताना दिसत आहे. यामध्ये सुशांत भिसे हे पीए असून त्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड कसे? या प्रश्नाने जोर धरला आहे.
पीए असूनदेखील पिवळे रेशनकार्ड –
तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे एका आमदाराचे पीए असूनदेखील त्यांच्या कुटुंबाकडे पिवळे रेशनकार्ड असल्याने अनेकांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत , भिसे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “आमदाराच्या पीएला केवळ 30 हजार रुपयांपर्यंतच मानधन दिलं जातं. आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत अन आमचं वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आम्हाला पिवळं रेशनकार्ड मिळणं कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे.”
“आम्ही तीन लाख रुपये भरण्यास तयार होतो आणि आमदार अमित गोरखे सात लाख रुपयांची व्यवस्था करत होते. पण , तरीही रुग्णालयाने उपचार नाकारले,” असा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट –
भिसे कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे की, “आमच्यावर मीडियातून ट्रोलिंग सुरू आहे. वारंवार चौकशीला बोलावले जात आहे. यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पण आम्ही न्यायासाठी लढा देत आहोत.” आम्ही तनिषाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. लवकरच आम्हाला न्याय दिला जाईल अशी आशा आहे , असे त्यांच्या कुटूंबाने म्हंटले आहे.