Suzuki Electric Scooter : Suzuki ने लाँच केली इलेक्ट्रिक स्कूटर; Activa ला देणार टक्कर

0
1
Suzuki Electric Scooter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Suzuki Electric Scooter- भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मोठ्याप्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे असंख्य गाड्याची विक्री होताना दिसत आहे. बाजारात वाढत असलेली संख्या हे दर्शवते की वाहन उत्पादकांना या सेगमेंटमध्ये खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये, जपानी दुचाकी निर्माता कंपनी सुजुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘Suzuki e-Access’ सादर केली आहे. या लाँच झालेल्या स्कूटरची थेट स्पर्धा इलेक्ट्रिक होंडा एक्टिवा या गाडीशी होताना दिसणार आहे. तर चला या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व फीचर्सची माहिती जाणून घेऊयात.

Suzuki Access Electric फीचर्स –

हि स्कूटर Access पेट्रोल वर्जनपेक्षा जरा वेगळी आहे. याची डिझाइन अधिक आकर्षक आणि आधुनिक ठेवण्यात आली आहे. स्कूटरमध्ये LED हेडलाइट आणि टेल-लाइटचा वापर करण्यात आलेला आहे. सीटची उंची 765 मिमी असून, ती पेट्रोल मॉडेलपेक्षा कमी आहे, ज्यामुळे लहान व्यक्तींना सवारीसाठी सोयीस्कर ठरते. तसेच , याचे ग्राउंड क्लीयरेंस 165 मिमी आहे, जे पेट्रोल मॉडेलपेक्षा जरा जास्त आहे. तरीही, या स्कूटरचे वजन 122 किलोग्रॅम आहे, जे पेट्रोल मॉडेलपेक्षा 18-19 किलो जास्त आहे. Suzuki e-Access इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.07 kWh क्षमतेचा लिथियम बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीचा दावा आहे की एकाच चार्जमध्ये स्कूटर 95 किमीची रेंज देईल. यामध्ये 4.1 kW पॉवर जनरेट करणारा इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. याचसोबत या स्कूटरची टॉप स्पीड 71 किमी प्रति तास आहे.

प्रत्येक प्रकारच्या रोड कंडिशनवर चाचणी (Suzuki Electric Scooter)

Suzuki Electric Scooter मध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम, स्मार्ट डिजिटल डिस्प्ले, स्मार्ट की, स्मार्टफोन कनेक्टिविटी, फंक्शन, USB पोर्ट आणि दीर्घकाळ टिकणारे आणि मेंटनन्स फ्री ड्राईव्ह बेल्ट यांसारखे फीचर्स दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की हि स्कूटर प्रत्येक प्रकारच्या रोड कंडिशनवर चाचणी करून तयार केली आहे. फ्रंटमध्ये टेलीस्कोपिक फोर्क आणि रियरमध्ये मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. याशिवाय, डिस्क/ड्रम ब्रेक सेटअप या स्कूटरच्या ब्रेकिंग क्षमतेला सुधारित करतो. या स्कूटरमध्ये 12 इंचाचे व्हील दिले आहेत.

ओव्हरचार्ज प्रिव्हेंशन फंक्शन –

सुजुकीचा दावा आहे की या स्कूटरसाठी दिला गेलेला 240W चार्जर 4 तास 30 मिनिटांत 0-80% पर्यंत चार्ज करू शकतो. पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तास 42 मिनिटांचा वेळ लागेल, परंतु फास्ट चार्जर वापरल्यास, हा वेळ 1 तास 12 मिनिट आणि 2 तास 12 मिनिट होतो, म्हणजेच फास्ट चार्जिंगमध्ये संपूर्ण चार्ज होण्यास सुमारे 4.5 तास लागतील. यामध्ये ओव्हरचार्ज प्रिव्हेंशन फंक्शन देखील दिला आहे, जो बॅटरीला ओव्हरचार्ज होण्यापासून वाचवतो.

थेट स्पर्धा होंडा एक्टिवा इलेक्ट्रिकशी –

भारतात लाँच झाल्यानंतर Suzuki e-Access (Suzuki Electric Scooter) चा थेट सामना होंडा एक्टिवा इलेक्ट्रिकशी होईल. यासोबतच सुजुकी या स्कूटरची किंमत किती ठेवते हे देखील महत्त्वाचे आहे . एक्टिवा इलेक्ट्रिकच्या बेस वेरिएंटची किंमत 1.17 लाख रुपये आणि टॉप वेरिएंटची किंमत 1.52 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच, एक्टिवा इलेक्ट्रिक एकाच चार्जमध्ये 102 किमी पर्यंतची रेंज देते.

हे पण वाचा : आनंदवार्ता ! आजपासून देशभरात आरक्षणाशिवाय धावणार 10 गाड्या ; जाणून घ्या, वेळापत्र आणि तिकीट दर

NHM पुणे अंतर्गत 68 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?