Swami Samarth Prakat Din : भिऊ नकोस..!! लाकूडतोड्याला झाला साक्षात्कार; ‘असा’ प्रगटला स्वामींचा दैवी अवतार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swami Samarth Prakat Din) आज दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी स्वामींचा प्रगटदिन आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, म्हणत कायम आश्वस्त करणारे स्वामी अनेकांचे श्रद्धास्थान आहेत. श्री स्वामी समर्थ हे १९ व्या शतकात होऊन गेले. श्री दत्तात्रेयांचे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंहसरस्वती या दिव्य अवतारांनंतर श्री स्वामी समर्थ हे त्यांचे पूर्णावतार आहेत.

इ.स. १४५९ मध्ये, श्री स्वामींनी गाणगापुर येथे श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या होत्या. यानंतर ते शैल यात्रेदरम्यान कर्दळीवनात अदृश्य झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी स्वतः स्वामींनी, ‘मी नृसिंहभान असून श्री श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे’, असे म्हटले होते. (Swami Samarth Prakat Din) यावरून ते गाणगापूरच्या श्री नृसिंहसरस्वती यांचे अवतार असल्याचे सुचविण्यात आले आहे.

आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि यानिमित्त आपण स्वामी कृपेच्या काही सत्य कथा जाणून घेणार आहोत. ज्यामधून येणारी ऊर्जा आणि चेतना अत्यंत दिव्य आहे. आजपर्यंत अनेकांना स्वामींच्या सोबतीची आणि स्वामी कृपेची प्रचिती आली आहे. आपल्या भक्तांच्या अडीअडचणीत स्वामी धावून येतात आणि संकट निरसन करतात, असा अनेकांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हे जगभरात ठिकठिकाणी विविध नावांनी वावरले आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये दत्त संप्रदायाचा प्रसार केला आहे.

प्रगटले स्वामी महाराज (Swami Samarth Prakat Din)

ही कथा आहे इ. स. १४५९ मधली. तयावेळी शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात अदृश्य झालेले स्वामी हे सुमारे ३०० वर्ष कठोर तपश्चर्या करत होते. या साधनेदरम्यान त्यांच्यावर अनेक मुंग्यांनी भव्य असे वारूळ रचले. एके दिवशी कर्दळीवनात उद्धव नामक लाकूडतोड्या आला. वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती जाऊन थेट वारुळावर पडली. कुर्हाडीचा घाव होताच वारुळातून रक्ताची धार उडाली आणि क्षणभरात दिव्य ज्योतीने परिसर उजळून निघाला. लाकूडतोड्या उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. ही मूर्ती म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज.

उद्धवाचा उद्धार

उद्धवाच्या निमित्ताने स्वामींनी भक्त कल्याणासाठी पुन्हा प्रगट होण्याचे ठरवले आणि ते मूर्ती स्वरूपात अवतरले. मात्र उद्धव पुरता घाबरून गेला होता. आपल्या हातून या दैवी महापुरुषाला जखम झाल्याचे अपार दुःख, यातना आणि भय त्याच्या मनी दाटले. काय होणार? या विचाराने त्याच्या काळजाचे पाणी पाणी होऊ लागले. (Swami Samarth Prakat Din) उद्धवाला काही समजण्याआधीच आपल्या भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या स्वामी महाराजांनी त्याला अभय प्रदान केले. त्यास आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण करून उद्धवाचा उद्धार केला.

श्री स्वामींचे भ्रमण

यानंतर स्वामींनी गंगातीरावर भ्रमण केले आणि असेच कलकत्त्यास महाकाली मातेच्या दर्शनास पोहोचले. पुढे काशी, प्रयाग करीत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. यावेळी स्वामींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. पुढे त्यांचे भ्रमण सुरूच राहिले. (Swami Samarth Prakat Din) पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ ते सोलापुर आणि अक्कलकोट असा त्यांनी प्रवास केला आणि या दरम्यान त्यांनी अनेक भक्तांचे कष्टनिवारण केले. अनेकांना दृष्टांत दिला आणि आपल्या भक्तांवर मायेची चादर पांघरत ते भ्रमण करीत राहिले.

अक्कलकोट येथे आगमन

अनेक आख्यायिकांनुसार, इ.स. १८५६ मध्ये श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट येथे आगमन झाले. इथे त्यांनी २२ वर्ष वास्तव्य केले. आजच्या घडीला अक्कलकोट हे अत्यंत मोठे तीर्थक्षेत्र झाले आहे. या अक्कलकोटमध्ये निवास करीत असताना स्वामींनी अनेक भक्तांचा उद्धार केला. त्या काळातील एक गोष्ट सांगितली जाते. (Swami Samarth Prakat Din) श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे निवास करीत असताना त्यांनी एका विलासी चिनी दाम्पत्याचे गर्वहरण केले होते. शिवाय हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांनादेखील त्यांनी चांगला धडा शिकवला होता.

श्री स्वामींचा कृपा कटाक्ष

श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले. त्यावेळी बडोद्याचे आळवणी बुवा नामक एक सत्पुरुष आपल्या ३ शिष्यांसाह आले होते. दरम्यान, ते सर्व आजारपणाने विकलांग झाले होते. त्यांची अवस्था अत्यंत बिकट आणि मरणप्राय झाली होती. अशावेळी स्वामींची स्वारी आली आणि त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांच्या आजराला पळवून लावले. (Swami Samarth Prakat Din) सगळ्यांना पोटभर जेऊ घातले आणि मायेने डोक्यावर हात ठेवला. स्वामींमुळे आळवणी बुवा आणि त्यांच्या शिष्यांना पुन्हा जीवन मिळाले.

कोण आहात आपण?

आळवणी बुवांनी श्री स्वामी समर्थांचे पाय धरले. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपण कोण आहात व कोठून आलात? अशी विचारणा केली. यावर श्री स्वामी म्हणाले, ‘माझा संचार संपूर्ण विश्वभरात आहे. मात्र सह्याद्री, गिरनार, काशिक्षेत्र, मातापूर, करवीर, पांचाळेश्वर, कुरवपूर, औदुंबर, करंजनगर, नृसिंहवाडी आणि गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत’. (Swami Samarth Prakat Din) हे ऐकताच आळवणी बुवांनी श्री स्वामी महाराज हे श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत, असा निष्कर्ष काढला. आळवणी बुवांनी आपला अनुभव बडोद्याला जाऊन लोकांना सांगितला. ज्यामुळे आळवणी बुवांना ‘स्वामी समर्थ भक्त’ अशी ख्याती मिळाली.

अधर्माला दाखवली धर्माची वाट

श्री स्वामी समर्थ महिमेचा आणखी एक किस्सा फार प्रसिद्ध आहे. आपल्याला नारायण सरोवर ठाऊक असेल. या ठिकाणी पापमुक्त होण्यासाठी भाविक स्नान करतात. त्याकाळी येथील महंत नारायण सरोवरात स्नान करण्यासाठी भाविकांकडून भरपूर पैसे घेत असत. इतकेच काय तर त्यांनी भाविकांकडून पैसे उकळण्यासाठी काही गुंड नेमले होते. (Swami Samarth Prakat Din) भाविकांची होणारी लूट पाहून श्री स्वामींनी या मुजोरांना वठणीवर आणायचे ठरवले. एक दिवशी श्री स्वामी समर्थ स्वतः या सरोवरात स्नान करण्यासाठी आले आणि तेव्हा गुंडांनी त्यांची अडवणूक करून पैशांची मागणी केली.

गुंडांकडे दुर्लक्ष करून स्वामी सरोवराकडे स्नानासाठी निघाले आणि हे पाहून गुंड संतापले. ते स्वामींना मारायला धावले आणि तेवढ्यात स्वामींनी त्यांच्यावरून उडी मारत थेट सरोवरात आपली बैठक मांडली. हा प्रकार पाहून गुंड थबकले आणि गुंडाना पोसणारे महंत देखील सरोवराजवळ आले. त्यांचे डोळे उघडले आणि ते सारी श्री स्वामी समर्थांना शरण आले. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांनी तीर्थक्षेत्र ठिकाणी अधर्म करणाऱ्या मुजोरांना धर्माचे सत्य समजावून योग्य वाट दाखवली.

वटवृक्ष समाधी

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी माध्याह्नकाली ‘वटवृक्ष समाधी मठस्थानी’ आपल्या दैवी अवतार कार्याची समाप्ती केली होती. स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले. अशी मान्यता आहे की, श्री स्वामी महाराज आपले अवतारकार्य संपवून पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले. असे असले तरीही भक्तांच्या हाकेला स्वामी सदैव धावून येतात. (Swami Samarth Prakat Din)

कोणतेही संकट असो स्वामी समोर उभे राहतात. स्वामींचे केवळ नाव घेता भीती पळून जाते. खऱ्या अर्थाने स्वामी नामात विशेष ऊर्जा आहे. त्यामुळे कधीही मनात चलबिचल झाली, भीती वाटली, हुरहूर वाढली किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जाणवली तर श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र जपावा. क्षणभरात तुम्हाला स्वामी कृपेची प्रचिती येईल.

।। श्री स्वामी तारक मंत्र ।।

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

(Swami Samarth Prakat Din)

उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी

।। श्री स्वामी समर्थ ।।