SwaRail SuperApp: भारतीय रेल्वेकडून स्वरेल अँप लाँच ; आता एकाच ठिकाणी मिळणार साऱ्या सुविधा

0
2
SwaRail SuperApp
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SwaRail SuperApp- देशभरातील लाखो लोक दररोज भारतीय रेल्वेच्या सुविधांचा वापर करतात, आणि त्यासाठी वेगवेगळ्या अँप्सचा वापर करावा लागतो. पण , आता वापरकर्त्यांना एकाच अँपवर रेल्वे सेवांची सर्व माहिती आणि सेवा मिळणार आहे. भारतीय रेल्वेने ‘स्वरेल’ (SwaRail SuperApp) हे सुपर अँप लाँच केले असून, यामध्ये आरक्षित आणि अनारक्षित तिकिट बुकिंग, प्लॅटफॉर्म आणि पार्सल बुकिंग, ट्रेन आणि PNR चौकशी, तसेच रेल माददद्वारे सहाय्य यासारख्या विविध सेवा समाविष्ट आहेत. अ‍ॅप सध्या गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर बीटा चाचणीसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच सार्वजनिक चाचणी पूर्ण केल्यानंतर सर्वांसाठी उपलब्ध होईल. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

अँपमधून दिल्या जाणाऱ्या सेवा (SwaRail SuperApp) –

आरक्षित तिकिट बुकिंग
अनारक्षित तिकिट आणि प्लॅटफॉर्म तिकिट बुकिंग
पार्सल आणि फ्रेट चौकशी
ट्रेन आणि PNR स्टेटस चौकशी
ट्रेनमध्ये अन्न ऑर्डर करणे
रेल माददद्वारे तक्रारींचे व्यवस्थापन

स्वरेल अँपची काही वैशिष्ट्ये –

वापरकर्ते एकाच लॉगिनसह सर्व रेल्वे सेवा वापरू शकतील.
सध्या विविध अ‍ॅप्सद्वारे जे सेवांचे वितरण होते, त्या सर्व सेवा आता एकाच अ‍ॅपमध्ये मिळतील.
नवीन वापरकर्त्यांसाठी लॉगिन प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे आणि ती आणखी सुलभ बनवण्यात आली आहे.

ॲप लवकरच सर्वांसाठी उपलब्ध –

(SwaRail SuperApp) ॲप सध्या बीटा चाचणीसाठी उपलब्ध आहे. पण , Google Play Store आणि Apple App Store या दोन्हींवर बीटा चाचणी स्लॉट भरलेले आहेत. ॲप लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. एकदा उपलब्ध झाल्यानंतर, वापरकर्ते ते प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतील. लॉग इन करताना, RailConnect किंवा UTS मोबाइल ॲपचे वापरकर्ते त्यांच्या क्रेडेन्शियल्ससह थेट लॉग इन करू शकतील.