Swelling Remedies : थंडीच्या दिवसांत हाता- पायांवर सूज का येते? जाणून घ्या कारण आणि घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swelling Remedies) थंडीचा मौसम आवडणारे बरेच लोक असतील. पण थंडीच्या या गुलाबी वातावरणात येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बरं? थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांना शरीर सुजण्याची समस्या होते. अनेकांच्या हाता- पायावर सूज येते. मात्र ही सूज नेमकी कशामुळे येते? याचे कारण काही कळत नाही. त्यामुळे नेमका काय उपाय करावा? हे समजत नाही.

शरीरावर येणारी सूज कधी कधी प्रचंड वेदनादायी असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात प्रत्येक वेळी हाता- पायांना सूज येणे ही आरोग्याच्या दृष्टीने चांगली बाब नाही. त्यामुळे आधी सूज येण्याचे कारण समजून घ्या आणि त्यानंतर अगदी सोप्या घरगुती उपायांच्या सहाय्याने आराम मिळवा. (Swelling Remedies) आता नेमके कोणते उपाय करायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात हाता- पायांवर आलेली सूज कमी करण्यासाठी उपयुक्त असणारे घरगुती उपाय सांगणार आहोत. पण तत्पूर्वी शरीरावर सूज येण्याचे नेमके कारण काय आहे? ते जाणून घेऊया.

थंडीत शरीरावर सूज का येते?

मित्रांनो आपल्या घरातील वृद्ध मंडळी अनेकदा थंडीच्या दिवसात हाता- पायांवर येणाऱ्या सुजेमुळे त्रस्त झाल्याचे आपण पाहिले असाल. याचे मूळ कारण सांगायचे झाले तर, हिवाळ्याच्या दिवसात शरीरातील रक्त परिसंचरण मंदावलेले असते. ज्यामुळे शरीरावर सूज येते. (Swelling Remedies)

शिवाय तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल तर तुमच्या शरीराला थंड वातावरणाची सवय झालेली असते. मात्र, थंडीचे प्रमाण वाढले असता तुमच्या हाता- पायांचा रंग लालसर दिसू लागतो आणि थोड्या वेळाने त्या भागावर सूज आल्याचे लक्षात येते. याशिवाय थंड पाण्यात सतत काम करणाऱ्या लोकांच्या हाता- पायांमधील रक्तप्रवाह बराच मंदावतो. ज्यामुळे सुजेची समस्या निर्माण होऊ शकते.

सूज घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा (Swelling Remedies)

1) कांद्याचा रस

प्रत्येक स्वयंपाक घरात कांदा असतोच. विविध भाज्या आणि विविध ग्रेव्ही बनवण्यासाठी कांद्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, तुम्हाला माहित आहे का? कांदा हा प्रति जैविक आणि अँटीसेप्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. ज्यामुळे कांद्याचा रस काढून सुजलेल्या भागी लावला तर काही वेळातच आराम मिळतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात जर तुम्हाला हाता- पायांवर सूज येत असेल तर कांद्याचा रस नक्की वापरून पहा.

2) बटाट्याचा रस

स्वयंपाक घरात जसा कांदा असतो तसा बटाटासुद्धा असतोच. बटाट्यातील जळजळ विरोधी तत्वे ही तुमच्या शरीरावरील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. (Swelling Remedies) त्यामुळे तुमच्या शरीरावर ज्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी एक बटाटा मीठ लावून चोळा किंवा बटाट्याचा रस काढून त्याने मसाज करा यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

3) मोहरीचे तेल

मोहरीचे तेल हे शरीरावरील सूज उतरवण्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. यासाठी मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात खडा मीठ घालून हे मिश्रण कोमट करून सूज आलेल्या भागावर मसाज करा. त्यानंतर तो भाग बांधून ठेवा किंवा उष्ण कापडाने गुंडाळून घ्या. असे काही दिवस केल्याने सूज येणे थांबेल आणि आराम मिळेल.

4) हळदीचा लेप

(Swelling Remedies) हळद ही अँटिसेप्टिक आणि प्रतिजैविक नैसर्गिक औषधी आहे. जिचा प्रभाव अत्यंत जालीम आहे. त्यामुळे शरीराच्या ज्या भागावर सूज आली असेल त्या भागावर हळदीचा लेप करून लावल्यास तीन ते चार दिवसात लगेच आराम मिळतो.

5) लिंबाचा रस

लिंबाचा रस हा शरीरावरील सूज कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर उपाय मानला जातो. (Swelling Remedies) यासाठी एक वाटी लिंबाचा रस काढून रात्री झोपण्यापूर्वी हाता- पायाच्या बोटांवर चोळा यानंतर ज्या ठिकाणी लिंबाचा रस लावला आहे तो भाग उष्ण कापडाने झाकून घ्या किंवा गुंडाळून झोपून जा. काही वेळात आराम मिळेल. शिवाय हा उपाय दोन ते चार दिवस सलग केल्यास सूज येण्याची समस्या कमी होईल.