Tata Curvv EV : आपल्याला माहितीच आहे की पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता. आता किफायतशीर वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढताना दिसतो आहे. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या कंपन्या बाजारात नवीन इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च करीत आहेत. आज आपण टाटा च्या नव्या लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही Curve EV या गाडीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात या गाडीचे (Tata Curvv EV) स्पेसिफिकेशन्स आणि किंमत ?
काय आहेत फीचर्स ? (Tata Curvv EV)
ही कार Acti.ev आर्किटेक्चरवर बांधली गेली आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 18 इंची अलॉय व्हील देण्यात आले आहेत. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 190 मिमी आहे. तसेच, SUV मध्ये 500 लीटरची बूट स्पेस आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, लेव्हल 2 ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, लेन कीप असिस्ट, क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड व्हील मॉनिटर, फ्रंट पार्किंग सेन्सर, रिअर पार्किंग सेन्सर आणि सर्व व्हील डिस्क ब्रेक यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली (Tata Curvv EV) आहेत.
कलर ऑप्शन्स ? (Tata Curvv EV)
रंगाच्या बाबतीत बोलायचे झाले तर टाटाची Curve EV पाच रंग पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते – प्रिस्टाइन व्हाइट, फ्लेम रेड, एम्पॉर्ड व्हाइट, व्हर्च्युअल सनराइज आणि प्युअर ग्रे. या रंगात ही कर उपलब्ध आहे.
Tata Curvv EV चे स्पेसिफिकेशन्स
Tata Curve EV दोन बॅटरी पॅक पर्यायांसह खरेदी करता येते. 45kWh बॅटरी पॅक आहे. दुसरा 55kWh बॅटरी पॅक आहे. त्याचा छोटा बॅटरी पॅक 502 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकतो. मोठा बॅटरी पॅक 585 किलोमीटरपर्यंतची रेंज देतो. यामुळे 400 ते 425 किलोमीटरची रेंज मिळू शकते. ही इलेक्ट्रिक कार केवळ 8.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. तर त्याचा टॉप स्पीड 160kmph आहे. Curve EV चा चार्जिंग रेट 1.2C आहे, ज्याच्या मदतीने ते फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 150 किलोमीटरपर्यंत ही कार चालवता (Tata Curvv EV) येते.
Tata Curvv ICE चे स्पेसिफिकेशन
Tata Curve तीन इंजिन पर्यायांमध्ये येत आहे. 1.2 लीटर, 3-सिलेंडर TGDi Heparion टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 123bhp पॉवर आणि 225Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे म्हणजे 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, जे 118bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. तिसरे म्हणजे 1.5 लिटर डिझेल इंजिन, जे 113bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क देते.
Curvv EV किंमत (Tata Curvv EV)
Tata Curve EV च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवातीची किंमत 17.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 21.99 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत. Curve च्या पेट्रोल/डिझेल मॉडेल्सची किंमत अद्याप जाहीर झाली असून 2 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल.