Tata Hospital For Pet : मुंबईत TATA ग्रुपतर्फे पशु रुग्णालयाची उभारणी; सर्व सुविधांसह लवकरच सुरु होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tata Hospital For Pet) अनेकांच्या घरात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळले जातात. अगदी कुटुंबाचा एक भाग असल्याप्रमाणे हे लोक आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेतात. माणसांसारखे प्राण्यांनाही वेगवेगळे आजार झाल्यास उपचारांची गरज भासते. अशावेळी उत्तम सोयी सुविधांनी समृद्ध पशु रुग्णालय असावे वाटते. ही गरज लक्षात घेऊन टाटा समूहाने मुंबईत पशु रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांना वेळीच योग्य उपचार मिळावे यासाठी टाटा समूहाने देशातील सर्वात पहिले सुपर स्पेशालिटी पशु रुग्णालय उभारले आहे. हे हॉस्पिटल कुठे आहे आणि कधीपासून सुरु होणार? याविषयी जाणून घेऊयात.

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी भारतात सर्वात पहिले सुपर स्पेशालिटी पशु रुग्णालय (Tata Hospital For Pet) उभारणार असल्याची घोषणा केली होती. या प्रकल्पाला ‘पेट प्रोजेक्ट’ असे नाव देण्यात आले. या रुग्णालयात विविध सोयी सुविधा दिल्या जाणार असून इथे प्राण्यांवर उपचार करण्यासाठी निष्णात पशुवैद्य तैनात करण्यात येणार आहेत. तसेच पाळीव प्राण्यांची देखभाल करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी नर्सदेखील असणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये प्राण्यांची सर्वोत्तम काळजी घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक लहान गोष्टीची पूर्तता केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कुठे केली उभारणी?

टाटा समूहाच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांसाठी बांधण्यात आलेले हे रुग्णालय मुंबईतील महालक्ष्मीत उभारण्यात आले आहे. (Tata Hospital For Pet) या रुग्णालयात सर्व प्रगत उपकरणांचा वापर केला जाणार आहे. तसेच ही उपकरणे वापरण्याचे ज्ञान असलेल्या तज्ञांच्या निदर्शनात त्यांचा वापर होईल. याशिवाय जगभरातील उत्तम पशुतज्ञ याठिकाणी प्राण्यांवर उपचार करतील. हि सेवा चोवीस तास प्रदान करण्यात येणार आहे. अशा अत्यंत प्रगत स्वरूपाच्या या रुग्णालयात सर्व सोयी सुविधा देण्याचा टाटा समूहाचा प्रयत्न आहे. चला तर या हॉस्पिटलविषयी अधिक माहिती घेऊया.

बांधकाम कसे आहे? (Tata Hospital For Pet)

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या ९८,००० चौरस फूट क्षेत्रफळात या रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानुसार, टाटा समूहातर्फे उभारल्या गेलेल्या या खास पशु रुग्णालयाची ५ मजली इमारत असून इथे २०० रुग्ण खाटांची क्षमता प्रदान करण्यात आली आहे.

रुग्णालयातील यंत्रणा कशी असेल?

टाटा समूहातर्फे बांधलेल्या या सुपर स्पेशालिटी पशु रुग्णालयात आवश्यक त्या प्रत्येक सोयी सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार, आपत्कालीन आणि क्रिटिकल केअर ही महत्वाची सुविधा असेल. यामध्ये २४ तास उपचार सेवा, इनपेशंट आणि आयसीयू युनिट्स (आयसोलेशन युनिट्ससह), सॉफ्ट टिश्यू सर्जरी, ऑर्थोपेडिक्स अशा सर्जिकल सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये फार्मसी सेवादेखील उपलब्ध असतील.

इतकेच नव्हे तर (Tata Hospital For Pet) रुग्णालयात सपोर्ट फंक्शन्स यंत्रणेचा समावेश राहील. यामध्ये रेडिओलॉजी आणि एमआरआय, एक्स-रे, सीटी स्कॅन आणि यूएसजी सारख्या सेवा प्रदान केल्या जातील. यासह रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबद्वारे हेमेटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सायटोलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, हिस्टो-पॅथॉलॉजी आणि ॲनेस्थेशिया यांचाही यंत्रणेत समावेश असणार आहे.

या रुग्णालयात मुक्या जीवांची काळजी घेण्यासाठी २४ तास डॉक्टर, नर्स आणि यंत्रणा सक्रिय असेल. तसेच प्रगत पशुवैद्यकीय सेवा सुविधेमधील मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर थॉमस हेथकोट [Chief Veterinary Officer, Advanced Veterinary Care Facility (ACVF) ] यांच्या हाताखाली डॉक्टर, नर्स, सर्जन, तंत्रज्ञ यांसारख्या ६६ जणांची टीम या रुग्णालयात तैनात करण्यात येणार आहे.

कधी सुरु होणार?

माहितीनुसार, प्राण्यासाठी बांधण्यात आलेले हे भव्य सुपर स्पेशालिटी पशु रुग्णालय येत्या मार्च २०२४ मध्ये उघडणार आहे. याबाबत सांगताना टाटा समूहाचे अध्यक्ष तारण टाटा यांनी सांगितले कि, ‘घरात पाळलेले प्राणी म्हणजे कुटुंबाचा एक भाग. ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि त्यांचा जीव त्या प्राण्याच्या मालकासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मी जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा मला समजते की, भारतामध्ये प्राण्यांची संख्या अधिक असूनदेखील त्यांच्या मूलभूत सुविधांबद्दल भारतात प्रचंड कमतरता आहे. म्हणूनच मुक्या प्राण्यांसाठी तयार होणाऱ्या या लहानश्या हॉस्पिटलचा त्यांची काळजी घेणे, त्यांना प्रेम देणे आणि त्यांचे आरोग्य जपणे हा हेतू आहे’. (Tata Hospital For Pet)