Tata Sumo 2025 : ९० च्या दशकात अनेकांच्या मनात स्थान निर्माण करणारी टाटा सुमो आता नव्या रूपात येणार आहे. या गाडीचा फर्स्ट लूक लॉन्च झाला आहे. त्यानुसार एकूणच ही गाडी बाजारात नक्की धुमाकूळ करणार असं दिसतंय. विशेष म्हणजे तज्ञांच्या म्हणण्यानुसार ही गाडी 30 ते 35 लाख किंमत असलेल्या टोयोटा फॉर्च्युनरला तगडी फाईट देईल. टाटा च्या या नव्या गाडीबद्दल आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या गाडीची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्यात असणार आहे अशी माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया काय असतील या गाडीचे (Tata Sumo 2025) फीचर्स
डिझाईन
TATA Sumo २०२५ च्या एलईडी हेडलाइट्स, टेललाइट्स, आणि कनेक्टेड फॉग लॅम्प्स कारमध्ये देण्यात आले आहेत. यामध्ये 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स आणि रूफ रेल्स देण्यात आल्याने कारला एक स्टायलिश लूक देतो . कारच्या रियरमध्ये शार्क-फिन अँटेना आणि स्पॉयलरसह सुधारित डिझाईन दिले गेले आहे.
प्रीमियम इंटीरियर
नवीन सुमोमध्ये प्रीमियम इंटीरियर पाहता येईल. यामध्ये जागा बऱ्यापैकी असेल. 5 ते 7 जणांच्या बसण्याची जागा असणार आहे. डिजीटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि आरामदायी अपहोल्स्ट्री यांसारखी वैशिष्ट्ये वाहनात आहेत. सुरक्षिततेसाठी, यात 6 प्लस एअरबॅग्ज, ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD, ब्रेक असिस्ट आणि 3 पॉइंट सीट बेल्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
इंजिन
नवीन सुमोमध्ये बीएस सिक्स मानक असलेलं 2.0 लीटर डिझेल इंजिन, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, आणि हायब्रिड इंजिन असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. 4×4 प्रणाली आणि लो-रेंज गेअरबॉक्समुळे ही गाडी ऑफ-रोडिंगसाठीही फारच उत्तम आहे.
किंमत
ही गाडी रफ अँड टफ एसयूव्हीच्या रूपात समोर येईल. सुरुवातीची किंमत अगदी 9 लाखांपासून सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मीड रेंज व्हेरिएंट हे 12 लाखांपासून उपलब्ध करुन दिलं जाऊ शकतं. तर या नव्या टाटा सुमोचं टॉप मॉडेल्स 22 लाखांपर्यंत जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत या कारची घोषणा कंपनीकडून केली जाईल.