Tata Winger : आजच्या घाईगर्दीच्या काळात, अनेक कुटुंबांना एकत्र प्रवासाची मजा लुटायची इच्छा असते. पण जेव्हा कुटुंब ७-८ जणांपेक्षा जास्त असतं, तेव्हा बहुतेकजण 7 सीटर SUV पुरेशी न वाटल्याने भ्रमंतीचे स्वप्न अपूर्णच राहतं. अशा वेळी एकच असा पर्याय आहे जो तुमच्या मोठ्या कुटुंबाला, नातेवाईकांनाही घेऊन फिरायला सहज घेऊन जाऊ शकतो आणि तो म्हणजे Tata Winger!
20 जण एकत्र प्रवास करू शकतील अशी ‘मिनी बस’
टाटा विंगर ही केवळ प्रवासासाठीच नव्हे तर मोठ्या कुटुंबासाठी वरदान ठरू शकते. एकावेळी 20 प्रवासी बसू शकतील एवढं मोठं कॅबिन, एसीसह आरामदायक सीट्स, मोकळा लेग स्पेस आणि प्रवासादरम्यान थकवा कमी करणारी रचना या व्हॅनमध्ये दिली आहे.
Tata Winger ची किंमत
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इतक्या सुविधांसह येणारी Tata Winger व्हॅन फक्त 7.20 लाख रुपयांपासून सुरू होते, आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 7.56 लाख रुपये आहे. ही किंमत टूर-ट्रॅव्हल व्यवसायासाठी किंवा मोठ्या कुटुंबासाठी एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते.
इंजिन आणि परफॉर्मन्स
Tata Winger मध्ये 2.2 लिटर Dicor डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन बीएस6 नियमांनुसार तयार करण्यात आलेलं असून, कमी प्रदूषणासह उत्तम मायलेज आणि पॉवर देतं. यामध्ये ABS, डिस्क ब्रेक्स आणि 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत जे याला सुरक्षित आणि स्थिर बनवतात.
व्यवसायासाठी किंवा कुटुंबासाठी उत्तम पर्याय
जर तुम्ही टूर-ट्रॅव्हल एजन्सी चालवत असाल, किंवा तुमचं कुटुंब मोठं असेल आणि तुम्हाला प्रत्येक सहलीत सगळ्यांना घेऊन जायचं असेल, तर Tata Winger हाच एक विश्वासार्ह पर्याय आहे. गावाकडच्या यात्रेपासून ते ट्रेकिंगच्या ट्रिपपर्यंत, ही व्हॅन सगळीकडे फिट बसते.




