हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tax Saving Tips) कोणत्या ना कोणत्या मार्गाने कर बचत व्हावी असे प्रत्येकाला वाटते. मात्र टॅक्स स्लॅबनुसार, ज्या लोकांचे आर्थिक उत्पन्न जास्त असते त्या लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का? जुन्या कर प्रणालीत इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की, ज्या लोकांचे २.५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असेल त्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. त्यामुळे १ लाखाहून जास्त कमाई असेल तर करबचतीसाठी अधिक धडपड करायची गरज नाही.
आता भारत सरकारने जुन्या कर प्रणाली अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर सूट दिली आहे. तर नव्या कर प्रणालीअंतर्गत ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट देण्यात आली आहे. (Tax Saving Tips) मात्र, तुमचे वार्षिक उत्पन्न या दोन्ही मर्यादेपेक्षा किंचितही जास्त असेल तर तुमची कर भरण्यापासून सुटका नाही. दरम्यान जुन्या कर प्रणालीत इन्कम टॅक्सच्या नियमानुसार २.५ लाख ते ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५% कराची तरतूद आहे. तर ५ लाख ते १० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर २०% कर आकारला जातो. तसेच जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख किंवा त्याहून अधिक असेल तर त्यावर ३०% कर स्लॅब आहे.
१० लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास ‘अशी’ करा करबचत (Tax Saving Tips)
जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्याहून जास्त असेल तर नियमानुसार तुम्हाला ३० टक्के कर भरावा लागेल. मात्र, यातही तुम्ही करबचत करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही गुंतवणूक करून इतर सवलतींचा लाभ घेऊनसुद्धा करबचत करू शकता. कसे? ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
PPF, EPF, ELSS, NSC सारख्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करा. यामुळे, आयकराच्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला १.५ लाख रुपयांचा कर वाचवता येईल.
(Tax Saving Tips) तसेच नॅशनल पेन्शन योजनेत (NPS) वार्षिक ५० हजार रुपयांपर्यंत स्वतंत्रपणे गुंतवणूक करा. ज्यामुळे कलम 80 CCD (1B) अंतर्गत तुम्हाला अतिरिक्त ५० हजार रुपयांचा आयकर वाचवता येईल.
याशिवाय गृहकर्ज घेतलयास आयकर कलम 24B अंतर्गत त्याच्या व्याजावर २ लाख रुपयांपर्यंतची कर बचत करता येईल.
आयकराच्या कलम 80D अंतर्गत वैद्यकीय पॉलिसी घ्या. यामध्ये तुम्ही २५ हजार रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. मात्र, या आरोग्य विम्यात तुमच्या नावासह तुमची पत्नी आणि मुलांची देखील नावे असायला हवी.
याशिवाय, तुमच्या पालकांच्या नावावर आरोग्य विमा खरेदी करा. यामुळे तुम्हाला आणखी ५० हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. (Tax Saving Tips)
करबचतीसाठी तुम्ही कोणत्याही संस्थांना देणगी दिल्यास २५ हजार रुपयांपर्यंतचा कर लाभ घेऊ शकता. प्राप्तिकराच्या कलम 80G अंतर्गत तुम्ही देणगी दिलेल्या रकमेवर २५ हजार रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करता येतो.
अशा प्रकारे तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांच्या टॅक्स स्लॅबपर्यंत येईल. ज्यामुळे आयकर नियमांनुसार जुनी करप्रणाली लागू होईल. परिणामी तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची सक्ती केली जाणार नाही. (Tax Saving Tips)