विमानतळा सारख्या मोठ्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्ही तिथे खाणं पिणे लोक शक्यतो टाळत असल्याचे पाहत असाल. कारण कोणत्याही पदार्थाचा दर हा अव्वाच्या सव्वा आकारला जातो. त्यामुळेच प्रवासी तेथील खाणपिण टाळतात. मात्र आता पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल वर याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे विमातळाच्या नव्या टर्मिनल वर चहा आणि पाणी स्वस्त मिळणार आहे.
लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल मधील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे १०० रुपयांना तर पाण्याची बाटली ६०/८० रुपयांना विकत घ्यावी लागते अशातच पुणे विमानतळ नव्या टर्मिनल वरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.
विमानतळावर विकल्या जाणाऱ्या चहा,कॉफीचे दर हे सामान्य नागरिकांना परवडणारे नसतात. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा आणि कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ही मागणी आता पूर्ण होत आहे त्यानुसार आता चहा आणि पाणी वीस रुपयात मिळणार आहे. प्रशासन नवीन टर्मिनल वर एक छोटासा स्टॉल सुरू करणार आहे त्यामुळे आता सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. या स्टॉलवर कमी दरात चहा आणि पाणी उपलब्ध होणार आहे.
विमानतळावर चहा कॉफीचे दर हे सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी उडान योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत काही प्रवाशांना कमीत कमी दरात चहा कॉफी उपलब्ध होणार आहे. उडान अंतर्गत आता चहा पाणी 20 रुपयात विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनल वर एक छोटासा स्टॉलवर सुरू करून सुविधा देणार आहे.