Technology : पावसाळ्यात कपडे गॅस शेगडीवर, इस्त्री करून सुकवण्याची कटकट नाही ; आलाय पोर्टेबल क्लोथ ड्रायर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Technology : पावसाळ्याच्या दिवसात पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे कपडे वाळत नाहीत. जर कपडे नीट वाळले नाहीत तर त्याला कुबट वासही येऊ लागतो. शिवाय ओले कपडे घातल्यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो. पावसाळ्यात शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरवर्गासाठी ही मोठी समस्या होऊन बसते. तुम्ही अनेकदा पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी ओले कपडे हेअर ड्रायर किंवा अगदी गॅस शेगडीवर ,किंवा मोठ्या बल्ब खाली ठेवले असतील. मात्र आता हे घरगुती फंडे वापरण्याची काही गरज नाही. कारण पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी एक लई भारी प्रोडक्ट (Technology ) बाजारात आले आहे. चला जाणून घेऊया या नव्या प्रोडक्ट बद्दल….

या प्रोडक्ट चे नाव आहे 220V इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट ड्रायर. विशेष म्हणजे हे प्रोडक्ट आकाराने लहान असल्यामुळे तुम्ही याला ट्रिप वर किंवा कुठेही घेऊन जाऊ शकता. पोर्टेबल क्लोथ ड्रायर काही मिनिटांत कपडे सुकवतात. त्यांचा (Technology ) वापर करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. केवळ एक बटन दाबल्यावर हे मशीन त्याचे काम सुरु करेल आणि मिनिटात तुमचे कपडे सुकतील

कुठून खरेदी कराल (Technology )

220V इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट लॉन्ड्री ड्रायर Amazon वरून खरेदी करता येईल. Amazon वर त्याची किंमत 58 टक्के डिस्काउंटसह 3,799 रुपये आहे. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. त्याची कपडे सुकवण्याची क्षमता 5KG आहे. यात थर्मोस्टॅटिक तंत्रज्ञान (Technology ) वापरण्यात आले आहे.

Auslese पोर्टेबल मिनी ड्रायर (Technology )

हा एक दुसऱ्या प्रकारचा ड्रायर आहे जो तुम्ही पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी वापरू शकता. हे पोर्टेबल मिनी क्लोथ ड्रायर Amazon वर देखील उपलब्ध आहे. 3,645 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये एबीएस प्लास्टिक आणि नायलॉन मटेरियल वापरण्यात (Technology ) आले आहे. हे शूज, मोजे किंवा लहान घरगुती वस्तू सुकविण्यासाठी वापरले जाऊ शकते. यावर ग्राहकांसाठी ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.