Pahalgam Terrorist Attack: दहशतवाद्यांनी नवऱ्याला मारलं, बायकोला सोडलं; म्हणाले मोदींना सांग कि…

_Pahalgam Terrorist Attack (5)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, या क्रूर हल्ल्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ अन फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच या हल्ल्यात कर्नाटकमधील व्यापारी मंजुनाथ यांना ठार करण्यात आले. या घटनेनंतर मंजुनाथ यांच्या पत्नीने मला हि मारून टाका असं म्हंटल्यावर दहशतवाद्यांनी मोदींना (Narendra Modi) हे सर्व जाऊन सांगा, यासाठी आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार आहे असं म्हंटले.

डोळ्यांसमोर गोळ्या घालून ठार (Pahalgam Terrorist Attack) –

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून लक्ष्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुस्लिम नसलेल्या पर्यटकांवरच गोळ्या झाडण्यात आल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या हल्ल्यात कर्नाटकमधील व्यापारी मंजुनाथ यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी त्यांना पत्नी पल्लवी यांच्या डोळ्यांसमोर गोळ्या घालून ठार केलं.

मोदींना हे सर्व जाऊन सांगा –

या घटनेनंतर (Pahalgam Terrorist Attack ) पल्लवी यांनी, “माझ्या पतीला मारलं, आता मलाही मारून टाका” असा टाहो फोडला. मात्र, यावर दहशतवाद्यांनी, “आम्ही तुम्हाला मारणार नाही, कारण तुम्ही मोदींना हे सर्व जाऊन सांगा, म्हणून तुम्हाला जिवंत सोडतो” असे सांगितल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

हल्ल्याचा तीव्र निषेध (Pahalgam Terrorist Attack )-

या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांनी प्राण गमावले आहेत. मृतांमध्ये डोंबिवली येथील 3, पुण्यातील 2 आणि पनवेलमधील 1 पर्यटक असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संबंधित कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack ) पंतप्रधान नरेंद्र मोदी अन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत असून, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.