Thane Chowpatty: सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार चौपाटी ; पावसाळ्यानंतर लोकार्पण

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Thane Chowpatty: खरंतर मुंबई दुसऱ्या आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे ‘मुंबई चौपाटी’. मुंबईतील गिरगाव, दादर चौपाटी ही अतिशय प्रसिद्ध असून मुंबईकर या ठिकाणी नेहमी गर्दी करत असतात. मात्र मुंबई प्रमाणेच ठाणेकरांना देखील आता चौपाटीचा आनंद घेता येणार आहे. पारसिक- मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर या चौपाटीचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी नक्कीच ही (Thane Chowpatty) आनंदाची बाब आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चौपाटीचं निरीक्षण केलं आणि याच दरम्यान त्यांनी घोषणा केली की पुढच्या दोन-तीन महिन्यांमध्ये ही चौपाटी जनतेसाठी खुली केली जाईल. यावेळी बोलताना आव्हाड यांनी सांगितले की “ही योजना ठाण्यासाठी 2009 पासून लांबलेली आहे. मात्र अनेक आव्हानानंतर या चौपाटीचे काम आता पूर्णत्वास येत आहे. हे पाहून आनंद (Thane Chowpatty) होतो आहे. “

खरंतर पारसिक- मुंब्रा येथील बहुप्रतिक्षित रेतीबंदर चौपाटी प्रकल्प हा 2009 पासून प्रस्तावित आहे. मात्र अनेक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता त्याचे लवकरच लोकार्पण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ठाणेकरांना निवांत वेळ (Thane Chowpatty) घालवण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे यात शंका नाही.

सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी (Thane Chowpatty)

दरम्यान रेतीबंदर खाडीच्या 4 km लांबीच्या बाजूने 42 एकरांवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर ही चौपाटी उभारण्यात येणार असून यामध्ये थीम पार्क, बोटिंग, अॅम्फी थिएटर,आणि मनोरंजनाचे अद्यावत साधनं त्याचबरोबर 18 अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. पुढच्या तीन महिन्यात या चौपाटीचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्याचे लोकार्पण (Thane Chowpatty) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ठाण्यातील खाडी आणि किनारे हे निसर्ग संपन्न आहेत. त्यामुळे या किनाऱ्यावर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी खाडी किनाऱ्यावर पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गायमुख चौपाटी (Thane Chowpatty) उभारण्यात आली होती. 2019 मध्ये या चौपाटीचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं. येथे देखील ठाणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.