मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या राज्यातील शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी सरकारचे रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यातीलच महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबई – पुण्याला जोडला जाणारा मिसिंग लिंक. आता या मिसिंग लिंकचे काम लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. या प्रकल्पांतर्गत खंडाळा घाटात स्टेड पूल उभा राहिलाय. या पुलाचं 90% काम आता पूर्ण झालं असून लवकरच हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वाचणार आहे.
सध्याच्या घडीला पाहायला गेले तर मुंबई ते पुणे या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असते. रहदारी ही जास्त असते. त्यामुळे बऱ्याचदा या मार्गावर लोणावळा घाटात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार ? असा सवाल तुमच्या डोक्यात आला असेल तर हा प्रकल्प डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे एम एस आर डी सी चे नियोजन आहे. खोपोली एक्झिट पासून ते लोणावळ्याच्या कुसगाव पर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे उभारण्यात येत आहेत. यातला सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ही 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किलोमीटर आहे. या दोन्ही बोगद्यांचा 98% काम पूर्ण झालय. खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी आल्या होत्या. मात्र आता पावसाळा संपत आल्यामुळे या कामाने वेग धरला आहे.
250 किमी हवेचा देखील होणार नाही परिणाम
या प्रोजेक्ट बद्दल एक विशेष बाब म्हणजे खोपोलीत होणारा उंच केबल ब्रिजवर 250 किलोमीटर हवेचा देखील परिणाम होणार नाही. हा पूल अफकॉन्स या कंपनीकडून तयार केला जात असून या कंपनीचे डायरेक्टर यांनी एका मराठी माध्यमाला माहिती देताना सांगितलं की, ज्या भागात या पुलाची निर्मिती होत आहे त्या ठिकाणी 25 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहत असतात जास्तीत जास्त वाऱ्याचा वेग 50 किलोमीटर प्रतितास आहे. पुलावर शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने धावू शकतात या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुलाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे या डिझाईनची विदेशात चाचणी करण्यात आलेली आहे. अधिक उंची आणि वेगवान वारे लक्षात घेऊन ही चाचणी करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी 250 किमी वेगाने वारी जरी वाहिले तरीही या काहीच होणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली आहे.