आपल्याकडे पूर्वीपासून असं म्हटलं जातं की घराला वाळवी लागू नये. कारण वाळवी ही कीड अशा पद्धतीची आहे जी अगदी भिंती, लाकडी वस्तू, कपडे, पैसे अशा सर्व वस्तू पोखरून टाकते. यामुळे तुमच्या घरात जर वाळवी लागली तर तुमचा चांगल्या पद्धतीचे फर्निचर खराब व्हायला वेळ लगणार नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः दमटपणा किंवा ओलसरपणामुळे घरामध्ये वाळवी लागण्याची शक्यता असते. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला घरामध्ये वाळवी लागली असेल किंवा लागू नये यासाठी कोणते उपाय करता येतील याची माहिती जाणून घेणार आहोत.
- लवंगाची पावडर वाळवी घालवण्यासाठी प्रभावी करू शकते. यासाठी लवंग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर पावडर अशा ठिकाणी स्प्रे करा जेथे वाळवी लागली आहे. यामुळे वाळवीची समस्या दूर होण्यास मदत होईल.
- लवंगाचे तुकडेही वाळवीची समस्या दूर करण्यास मदत करू शकतात. वाळवी लागलेल्या ठिकाणी लवंगाच्या पावडरसोबत अख्खी लवंगही ठेवा.
- लवंगाचे तेल वाळवी दूर करण्यासाठी कामी येईल. हे तेल मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. लवंगाचे तेल पाण्यात मिक्स करुन स्प्रे बॉटलमध्ये भरा.वाळवी लागलेल्या ठिकाणी लवंगाचे तेल स्प्रे करा. लवंगाच्या वासामुळे वाळवी निघून जाण्यास मदत होईल.
- याशिवाय लवंगाचे तेल लाकडाचे फर्निचर, कपाट, भिंती आणि अन्य ठिकाणीही स्प्रे करुन ठेवा. ज्या-ज्या ठिकाणी वाळवी पसरू शकते तेथे लवंगाचे तेल स्प्रे करून ठेवा. लक्षात ठेवा की, लवंगाचे तेल आणि पाण्याचे लिक्विडचा स्प्रे सातत्याने दोन ते तीन दिवस करावा लागेल. यामुळे वाळवी हळूहळू दूर होण्यास मदत होईल.