शास्त्रज्ञ हैराण !! महाराष्ट्रातील ‘ या’ ठिकाणी वाहतोय उलटा धबधबा

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शालेय जीवनापासून गुरुत्वाकर्षणाच्या नियम (Law of Gravitation)ऐकत आलो आहोत. पण महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात दोन अशी अद्भुत ठिकाणं आहेत, जिथं गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा उलट परिणाम पाहण्यास मिळतो. या ठिकाणांवर जाऊन पर्यटकांना जगावेगळा अनुभव अनुभवण्यास मिळतो. तिथे पाणी आकाशाच्या दिशेने वाहते , जे एक मोठे वैज्ञानिक आश्चर्य मानले जाते . तर चला या महत्वाच्या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

निसर्गाचा अद्धभूत अविष्कार –

या धबधब्यांमध्ये पाणी जमीनीकडून वर उठून, उलट्या दिशेने वाहतं. या अनोख्या नैसर्गिक दृश्याने पर्यटकांना चकित करायला भाग पाडलं आहे. हे धबधबे म्हणजे निसर्गाचा अद्धभूत अविष्कार मानले जातात. पुण्याच्या जुन्नरजवळील नाणेघाट धबधबा आणि सातारा जिल्ह्यातील सडा वाघापूर (Sadawaghapur)येथील धबधबे हे प्रसिद्ध उदाहरणे आपल्याला पाहण्यास मिळतात.

उलट्या दिशेने वाहणारे धबधबे –

नाणेघाट धबधबा, ज्याला ‘उलटा धबधबा’ देखील म्हणतात, कोकण समुद्रकिनारा आणि जुन्नर नगर यांच्या मध्यभागी स्थित आहे. या धबधब्याचा जलस्रोत नाणेघाटाच्या डोंगरातून आहे. विशेषत: पावसाळ्याच्या मोसमात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. शास्त्रज्ञांच्या मते, येथील वारे खूप वेगाने वाहतात, ज्यामुळे पाणी उलट्या दिशेने वाहतं. त्याचप्रमाणे, साताऱ्यातील सडा वाघापूर येथील धबधबा देखील वाऱ्याच्या जोरावर उलट्या दिशेने वाहतं. या ठिकाणाचा आकर्षण वाऱ्याच्या दाबावर अवलंबून आहे. वाऱ्याच्या शक्तीमुळे, या धबधब्याचं पाणी मागे जातं आणि एक अद्भुत दृश्य तयार होतं.

उलट्या धबधब्यांचे अद्भुत दृश्य –

या धबधब्यांचा नजारा पर्यटकांसाठी एक अप्रतिम अनुभव बनला आहे. उलट्या धबधब्यांचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात , आणि यामुळे स्थानिक पर्यटनाला देखील चालना मिळत आहे.