झेलम एक्सप्रेसच्या प्रवाशांकरिता खुशखबर ! पाचही रेकमध्ये होणार बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे ते थेट जम्मू तवीला पोहोचणारी ‘झेलम एक्सप्रेस’ अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहेत. या एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवाशांना भारतातील विविध राज्यांमधून विशेषतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, दिल्ली एनसीआर आणि पंजाब मधून देखील प्रवास करण्याचा आनंद मिळतो. मात्र 1977 पासून सुरू असलेल्या झेलम एक्सप्रेस चा गरेक बदलण्याची अनेक प्रवाशांची मागणी होती. मात्र अखेर आता ही मागणी पूर्ण होत असून मध्य रेल्वे कडून झेलम एक्सप्रेसला नवीन रेक जोडण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे झेलम एक्सप्रेस ला नवीन एलएचबी म्हणजेच (लिंक हॉफमन पुश) प्रकारचा रेक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. झेलम एक्सप्रेसचे पाच रेक असून त्याच्या पाचही रेक मध्ये हा बदल करण्यात येणार आहे.

मिळालेलय माहितीनुसार, हा बदल 25 ऑगस्ट पासून सुरू होणार असून या तारखेपासूनच नवीन रेक जोडायला सुरुवात होईल. त्यामुळे सध्या आयसीएफच्या जुनाट डब्यातून प्रवाशांची सुटका होणार आहे. एल एच बी रेक मध्ये एकूण 22 डबे जोडण्यात आले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी झेलम एक्सप्रेसचा रेक बदलण्याची मागणी करत होते. मात्र मध्य रेल्वे ला रेक उपलब्ध होत नसल्यामुळे रेक मध्ये बदल झाला नाही. मात्र आता रेक उपलब्ध झाल्याने रेल्वे प्रशासनाने नवीन बरेक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.

‘या’ महत्वाच्या स्थानकावर घेते थांबे

  • अहमदनगर
  • मनमाड
  • जळगाव
  • भोपाळ
  • झाशी
  • ग्वाल्हेर
  • आग्रा कॅन्ट
  • मथुरा
  • नवी दिल्ली
  • कुरुक्षेत्र
  • अंबाला शहर
  • लुधियाना
  • पठाणकोट कॅन्ट