हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात ऑफ-रोडिंग, सुपरमोटो आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिना बाईकप्रेमींसाठी खूपच खास ठरणार आहे. KTM, Hero, Bajaj आणि Kawasaki या नामवंत कंपन्या आपल्या नव्या मॉडेल्ससह भारतीय बाजारात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी हि मोठी खुशखबर आहे. तर चला जाणून घेऊयात या एप्रिल महिन्यात कोणत्या दुचाकी गाड्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.
अधिक शक्तिशाली, अधिक अॅडव्हेंचरस KTM 390 Adventure R –
KTM आपल्या प्रसिद्ध 390 Adventure मालिकेतील नवीन 390 Adventure R मॉडेल भारतात लाँच करणार आहे. या नव्या व्हर्जनमध्ये अधिक मजबूत सस्पेन्शन, मोठं रिअर व्हील आणि उंच सीट हाइट देण्यात आली आहे, जी ऑफ-रोडिंगसाठी उपयुक्त आहे. 390cc इंजिनसह ही बाईक सुमारे 4 लाख किंमतीत येण्याची शक्यता आहे.
सुपरमोटो सेगमेंटमध्ये नवा गेमचेंजर KTM 390 SMC R –
KTM चं आणखी एक आकर्षक मॉडेल 390 SMC R ही सुपरमोटो शैलीतील बाईक आहे, जी सध्या भारतात दुर्मिळ मानली जाते. स्ट्रीट रायडिंगसाठी परफेक्ट असलेली ही बाईक सुमारे 3.4 लाख किंमतीत लाँच होऊ शकते. KTM ला या सेगमेंटमध्ये ‘फर्स्ट मूव्हर ऍडव्हांटेज’ मिळू शकतो.
नवा अवतार Hero Karizma XMR 250 –
Hero MotoCorp त्यांच्या लोकप्रिय Karizma मालिकेतील नव्या Karizma XMR 250 सोबत पुनरागमन करत आहे. 210 मॉडेल बंद झाल्यानंतर 250cc इंजिन, नवीन डिझाइन आणि अत्याधुनिक फिचर्ससह ही बाईक भारतीय बाजारात एक मजबूत दावेदार ठरू शकते.
स्मार्ट आणि परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर Bajaj Chetak 3503 –
Bajaj आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Chetak 3503 लवकरच सादर करणार आहे. 3.5kWh बॅटरी पॅकसह ही स्कूटर Chetak प्रमाणेच डिझाइन असलेली पण नव्या फिचर्सनी सजलेली असणार आहे. ही Bajaj ची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. त्यामुळे ग्राहकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
नव्या फिचर्ससह परतणार पॉवरहाऊस बाईक Kawasaki Z900 –
Kawasaki आपल्या झगमगत्या Z मालिकेतील Z900 बाईकला 2025 मध्ये नव्या अपग्रेड्ससह बाजारात आणणार आहे. TFT डिस्प्ले, 6-axis IMU आणि अन्य अॅडव्हान्स फिचर्ससह ही बाईक परफॉर्मन्स आणि टेक्नॉलॉजीचा परिपूर्ण संगम असेल. त्यामुळे यंदाचा एप्रिल महिना दुचाकी बाजारासाठी खूपच उत्साहवर्धक ठरणार आहे. जर तुम्ही नव्या बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर हा महिना तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो.