Green FD : ‘या’ बँका देतात ग्रीन FD ची सुविधा; मिळतो सुरक्षित आर्थिक परतावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green FD) भारतात एफडी योजना हा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर पर्याय मानला जातो. त्यामुळे अनेक लोक एफडीमध्ये गुंतवणे पसंत करतात. आपल्या देशात अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांची काळजी घेण्यासाठी कायम वेगवेगळ्या सुविधा प्रदान करत असतात. यांपॆकी एक म्हणजे एफडी योजना.

एफडी ही योजना गुंतवणूकदारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांनीआपल्या ग्राहकांसाठी खास ग्रीन एफडी योजना लाँच केली आहे. ही योजना नेमकी काय आहे? आणि ती कशी काम करते? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट योजना (SGRTD)

भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चा समावेश आहे. त्यामुळे SBI मध्ये खाती असणारे अनेक ग्राहक आहेत. जे कायम बँकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेत असतात. (Green FD) दरम्यान, अलीकडेच ग्राहकांसाठी SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट ही नवी योजना सुरु करण्यात आली आहे. ही एक विशेष ठेव योजना असून या योजनेचा उद्देश ‘पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी पैसे उभारणे’ हा आहे.

कोण गुंतवू शकतो?

SBI ची SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (SGRTD) ही योजना बँकेच्या शाखा नेटवर्कद्वारे उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती ही भारतीय, NRI किंवा NRO असू शकते.

कालावधी

SBI च्या SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (Green FD) या योजनेमध्ये किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये कमाल मर्यादा नाही. तसेच या योजनेत ३ वेगवेगळ्या कालावधीत गुंतवणूक करण्याची सुविधा प्रदान केली जाते. यामध्ये ११११ दिवस, १७७७ दिवस आणि २२२२ दिवसांचा कालावधी प्रदान केला जातो.

व्याजदर

SBI च्या नियमित FD ठेवींच्या तुलनेत यामध्ये थोडे कमी व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास वार्षिक ६.१५% ते ७.४०% व्याजदर प्रदान केला जातो. या योजनेत ११११ दिवस आणि १७७७ दिवसाच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास सामान्य गुंतवणूकदारांना ६.६५ टक्के इतके व्याज दिले जाते. तर ज्येष्ठ गुंतवणूकदारांना ७.१५ टक्के इतके व्याज दिले जाते.

(Green FD) तसेच या योजनेत २२२२ दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास सामान्य गुंतवणूकदारांना ६.४० टक्के इतके व्याज दिले जाते. तर ज्येष्ठ गुंतवणूकदारांना ७.४० टक्के इतके व्याज दिले जाते. यात जमा केलेल्या रकमेवर कर्ज आणि ओव्हरड्राफ्ट सेवादेखील प्रदान केली जाते.

BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजना (Green FD)

देशात बँक ऑफ बडोदा (BOB) ही बँक देखील आर्थिक क्षेत्रातील मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेनेसुद्धा आपल्या ग्राहकांसाठी अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश केवळ पैसा उभारणे इतकाच आहे. हा पैसादेखील पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये गुंतवला जाणार आहे.

कोण गुंतवणुक शकतो आणि किती व्याज मिळेल?

BOB च्या अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेत सामान्य जनता, निवासी भारतीय, अनिवासी भारतीय आणि HNI गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. (Green FD) बँक ऑफ बडोदाने संगितल्याप्रमाणे, या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना वार्षिक स्वरूपात ७.१५ टक्के व्याज दिले जाईल.

स्थिर आणि सुरक्षित आर्थिक परतावा

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO देबदत्त चंद यांनी अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेबाबत सांगितले की, ‘ही योजना सुरू केल्याने गुंतवणूकदारांना स्थिर आणि सुरक्षित आर्थिक परतावा मिळण्याचा दुहेरी फायदा बँकेकडून प्रदान केला जाईल. या योजनेतून जमा होणारा पैसा हा देशातील हरित प्रकल्प किंवा क्षेत्रांमध्ये गुंतवला जाईल. (Green FD)