महिलांनो व्हा आर्थिक सक्षम ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजना ठरतील जबरदस्त फायदेशीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी पोस्ट ऑफिस विविध योजना घेऊन येत असते. ज्यामुळे त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहून , त्यातून चांगला नफा प्राप्त होईल . पोस्ट ऑफीसच्या विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे एक लाभदायक पर्याय ठरू शकतो . या योजनांमध्ये कमी जोखीम असून चांगले व्याजदर मिळते . त्यामुळे महिलांना बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या योजनांमधून जास्त परतावा मिळवता येतो . तर आज आपण अशा काही योजनांबद्दल माहिती पाहणार आहोत ज्यामुळे महिला आर्थिक स्वावलंबी होऊन चांगला नफा मिळवतील.

सुकन्या समृद्धी बचत योजना

सुकन्या समृद्धी योजना ही कन्येच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत मुलीच्या वयाच्या 10 वर्षांपूर्वी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सध्या या योजनेवर 8.2 % वार्षिक व्याज मिळते. योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असून कलम 80 सी अंतर्गत कर सवलत देखील मिळते. तरी सुरक्षित गुंतवणुकीसाठी तसेच अधिक व्याजदराची हि योजना फायदेशीर ठरणार आहे.

पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजना (MIS)

महिलांसाठी ही योजना नियमित मासिक उत्पन्नाचा स्रोत ठरू शकते. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते . या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.4% वार्षिक व्याज दरावर मासिक उत्पन्न मिळते.

महिला सन्मान बचत पत्र

ही योजना विशेषतः महिलांसाठी बनवण्यात आली आहे. यात कोणत्याही वयाची महिला गुंतवणूक करू शकते. योजनेत एका खात्यात 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि 7.5% व्याज दर मिळतो. 1 वर्षानंतर गुंतवणुकीच्या 40% रक्कम काढण्याची परवानगी असते.

राष्ट्रीय बचत पत्र (NSC)

राष्ट्रीय बचत पत्र ही सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम योजना आहे. या योजनेत किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.5% व्याज मिळते. परंतु, 1 ऑक्टोबरनंतर नवीन एनएससीमध्ये व्याजदर शून्य करण्यात आले आहेत.

पोस्ट ऑफीस सार्वजनिक भविष्य निधी (PPF)

PPF योजना ही दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. यात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. योजनेवर 7.1% वार्षिक व्याज मिळते. दीर्घकालीन निधी वाढवण्याचे आणि कर वाचवण्याचे हे एक उत्तम पर्याय आहे. या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करून महिलांना आर्थिक सुरक्षितता मिळण्यासोबतच चांगला नफा देखील मिळतो. महिला या योजनांचा वापर करून आपले भविष्य सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवू शकतात.