हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षात क्रीडा (sports) क्षेत्रात विविध महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिकांचा थरार अनुभवता येणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो यांसारख्या लोकप्रिय खेळांपासून ते बॅडमिंटन, टेनिस, नेमबाजी, कुस्तीपर्यंत अनेक खेळांच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धा क्रीडारसिकांना व्यस्त ठेवणार आहेत. तर चला या स्पर्धांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
क्रिकेट स्पर्धा –
क्रिकेट जगतात 2025 वर्षाचा क्रिकेट कॅलेंडर विशेष असणार आहे. या वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सात वर्षांनंतर पुन्हा सुरू होईल, जी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि दुबईमध्ये रंगेल. महिलांच्या क्रिकेटसाठी महिला एकदिवसीय विश्वकरंडक, सप्टेंबर महिन्यात भारतात आयोजित केला जाईल. आयपीएल 2025 देखील 14 मार्च ते 25 मे दरम्यान रंगणार आहे, ज्याची क्रिकेटप्रेमींनी आतुरतेने वाट पाहिली आहे. तसेच, इंग्लंडविरुद्ध भारताची टी-20 आणि एकदिवसीय मालिका जानेवारी, तसेच पाच कसोटी सामन्यांची मालिका या वर्षीच्या जून – जुलै क्रिकेट कॅलेंडरमध्ये आकर्षण ठरणार आहे.
हॉकी स्पर्धा –
2024-25 सीझनमध्ये हॉकीच्या विविध प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषांसाठी हॉकी इंडिया लीग 28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान होईल, तर महिलांसाठी ही स्पर्धा 12 ते 26 जानेवारी दरम्यान खेळली जाईल. त्यानंतर, हॉकी प्रो लीगचा पुरुष स्पर्धा 15 फेब्रुवारी ते 22 जून दरम्यान, आणि महिला स्पर्धा 15 फेब्रुवारी ते 29 जून पर्यंत होईल. यासोबतच, राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 4 ते 15 एप्रिल दरम्यान आयोजित केली जाईल. तसेच, भारतामध्ये होणाऱ्या हॉकी ज्युनियर विश्वकरंडकाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. या सर्व स्पर्धा भारतीय हॉकीचा दर्जा आणि विकास आणखी एक पाऊल पुढे नेतील.
कबड्डी आणि खो-खो –
खो-खोमध्ये, पहिला विश्वकरंडक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे होईल, ज्यामध्ये पुरुषांच्या स्पर्धेत 21 आणि महिलांच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी होतील. कबड्डीच्या बाबतीत, पुरुषांच्या विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल, तर महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धा मार्चमध्ये पाटणामध्ये होतील. प्रो कबड्डी लीग जुलै महिन्यात अपेक्षित आहे. महाराष्ट्राची कबड्डी लीग मे महिन्याच्या अखेरीस होईल. मॅरेथॉनच्या बाबतीत, मुंबई मॅरेथॉन 19 जानेवारीला आयोजित होईल, लंडन मॅरेथॉन 27 एप्रिलला आणि बजाज अलियान्स पुणे अर्थ मॅरेथॉन डिसेंबरच्या मध्यावर होईल.
फुटबॉल स्पर्धा –
इंग्लिश प्रीमीयर लीग आणि स्पॅनिश लीग (ला लीगा) यांचा रोमांचक सीझन सुरू राहील. याशिवाय, 14 जून ते 23 जुलै दरम्यान अमेरिका येथे क्लब विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये 32 क्लब सहभागी होतील. तसेच, विश्वकरंडक पात्रता सामने देखील महत्त्वपूर्ण असतील. महिलांच्या युरो स्पर्धेचे आयोजन 2 ते 27 जुलै दरम्यान होईल. त्याचप्रमाणे, फिफा 20 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा 27 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान होईल, या सर्व स्पर्धांमुळे फुटबॉलप्रेमींसाठी 2025 एक अविस्मरणीय वर्ष ठरेल.
अॅथलेटिक्स ( Athletics ) –
2025 मध्ये अॅथलेटिक्स क्षेत्रातही मोठ्या स्पर्धांचा भरगच्च कार्यक्रम आहे. जागतिक अॅथलेटिक्स रिले स्पर्धेचे आयोजन 10-11 मे दरम्यान चीनमध्ये होईल. त्यानंतर, एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियन्सशीप 27 ते 31 मे दरम्यान आयोजित केली जाईल. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा जपानमध्ये 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान होईल, याशिवाय, डायमंड लीग 26 एप्रिल ते 28 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी होईल, ज्यामध्ये जगभरातील अॅथलीट्स आपला सर्वोत्तम प्रदर्शन करतील. या सर्व स्पर्धा अॅथलेटिक्सच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठे प्रतिस्पर्धा आणि रोमांचक क्षण निर्माण करतील. तसेच भारतात प्रथमच पैरा अॅथलेटिक्स अदिक्यपद स्पर्धा 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत नवी दिल्लीत होणार आहे.
बॅडमिंटन स्पर्धा –
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्लीमध्ये 14 ते 19 जानेवारी दरम्यान होईल. विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाईल. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा लखनौमध्ये 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होईल. त्यानंतर, विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पॅरीसमध्ये आयोजित केली जाईल, आणि ऑल इंग्लंड चॅम्पियन्सशीप लंडनमध्ये 11 ते 16 मार्च दरम्यान होईल.
इतर स्पोर्ट्स –
ऑस्ट्रेलियन ओपन मेलबर्नमध्ये 12 ते 26 जानेवारी दरम्यान होईल. त्यानंतर फ्रेंच ओपन पॅरिसमध्ये 25 मे ते 7 जून दरम्यान आयोजित केला जाईल. विम्बल्डन लंडनमध्ये 30 जून ते 13 जुलै दरम्यान होईल. शेवटी, युएस ओपन न्यूयॉर्कमध्ये 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होईल. नेमबाजीमध्ये, जागतिक अजिंक्यपद (पिस्तूल आणि रायफल) 6 ते 16 नोव्हेंबर दरम्यान कैरो, इजिप्तमध्ये होईल, ज्यातून 2028 लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली जाईल. टेबल टेनिसचे विश्व अजिंक्यपद 17 ते 25 मे दरम्यान कतारमध्ये होईल. तिरंदाजीचे विश्व अजिंक्यपद 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान दक्षिण कोरियामध्ये होईल. जिम्मॅस्टिकचे विश्व आर्टिस्टिक स्पर्धा 11 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होईल. वेटलिफ्टिंगची विश्व स्पर्धा 1 ते 10 ऑक्टोबर नॉर्वेमध्ये होईल. कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी जानेवारीत होईल, आणि जागतिक कुस्ती स्पर्धा 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान क्रोएशियामध्ये होईल. बुद्धिबळचे विश्व अजिंक्यपद 23 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान माँटेग्रोमध्ये आणि महिला विश्वकरंडक 5 ते 21 जुलै दरम्यान जॉर्जियामध्ये होईल.