Toilet Cleaning Hacks : टॉयलेटमधील मोठ्या समस्येवर आईस्क्रीमच्या काठीचा ‘असा’ वापर; विचारही केला नसेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Toilet Cleaning Hacks) आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं असणं ही आपली जबाबदारी असते. कारण अस्वच्छता ही आपल्या सोबत अनेक आजार घेऊन येते. यामध्ये टॉयलेटची स्वच्छता सर्वाधिक महत्वाची. अन्यथा मोठमोठ्या आजरांना तोंड द्यावे लागते. यामुळे घरातील टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण कितीतरी लिक्विड सोप्स, क्लिंझर, वॉशिंग पावडर, ब्लिच आणि अनेक महागडी उत्पादने वापरतो. पण यासोबतच आईस्क्रीमची छोटीशी काठीदेखील टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी तुमची मदत करू शकते, याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल माहित तर हा व्हिडीओ नक्की पहा.

आईस्क्रिम म्हणताच कितीतरी लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आपण आईस्क्रिम किंवा कुल्फी खाल्ल्यावर त्याची छोटीशी काठी फेकून देतो. सर्वसामान्यपणे सगळेच असं करत. (Toilet Cleaning Hacks) आईस्क्रीमच्या काठ्यांचा वापर टाकाऊ ते टिकाऊ वस्तूंसाठी होतो. पण कधी टॉयलेटमध्ये आईस्क्रीमच्या काठीचा वापर केला आहे? एका गृहिणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दाखवलेला हा जुगाड खरंच थक्क करणारा आहे. यामध्ये तिने आईस्क्रिमची एक छोटीशी काठी टॉयलेटमध्ये अशा पद्धतीने वापरली आहे जे आश्चर्यकारक आहे.

टॉयलेटच्या साफसफाईत आईस्क्रीमची काठी फायदेशीर (Toilet Cleaning Hacks)

साफसफाई घराची असो किंवा घरातील टॉयलेटची, ती करताना गृहिणींची भारी दमछाक होते. टॉयलेटमध्ये छोट्या मोठ्या जागेवर सफाई करणे अगदी कठीण होऊन जाते. यामध्ये टॉयलेटच्या सगळ्यात अस्वच्छ भाग वेळीच साफ केला नसेल तर तो इतका अस्वच्छ होतो की नंतर साफ करताना अगदी नको नको वाटत. मुख्य म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट- बाथरुम हे वेळोवेळी स्वच्छ करणे फार महत्वाचे असते. अशावेळी किरकोळ आणि बिनकामाची वाटणारी आईस्क्रीमची काठी मात्र मोठ्या कामाची ठरते.

छी! छी! ना करे टॉयलेट में आइसक्रीम का कमाल देखे।। Useful tips।।

व्हायरल व्हिडीओ

आईस्क्रिम खाल्ल्यानंतर जी काठी आपण फेकून देतो तीच वापरून एका गृहिणीने एक जबरदस्त जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा हा व्हिडीओ (Toilet Cleaning Hacks) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून भारी कामाचा सिद्ध झालाय. या व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की या महिलेने एक आईस्क्रिमची काठी घेतली आहे. या काठीच्या टोकावर तिने डबल साइड टेप लावली आहे. यानंतर ही आईस्क्रिमची काठी घेऊन ती महिला टॉयलेटमध्ये जाते. यानंतर टॉयलेट सीट कव्हरच्या खाली आईस्क्रीमची काठी लावते.

ज्यामुळे टॉयलेट कव्हर वर खाली करणे अगदी सोपे जात आहे. या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे आईस्क्रीमची काठी वापरून तुम्हाला अगदी घरगूती पद्धतीने असा टॉयलेट कव्हर होल्डर बनवता येईल. या हॅकमुळे तुमच्या हाताचा थेट टॉयलेट कव्हरसोबत येणारा संपर्क टाळता येईल. ज्यामुळे हायजिन सांभाळता येईल. (Toilet Cleaning Hacks) त्यामुळे आता आपल्या हातांनी टॉयलेट सीट कव्हर वर खाली करायची गरज नाही. हा जबरदस्त जुगाड एका गृहिणीने सोशल मीडिया युट्युब seemafamilyvlog71 नावाच्या चॅनेलवर शेअर केला आहे. जो अगदी सोपा आणि फायदेशीर आहे.