Toll Plaza : पुणे सातारा मार्गावर ‘टोलधाड’ ; प्रवासी आणि पर्यटकांच्या खिशाला कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Toll Plaza : दरवर्षी टोलच्या रकमेत वाढ केली जाते. यंदाच्या वर्षी देखील टोलच्या रकमेत वाढ केली जाणार असून जर तुम्ही पुणे, मुंबईहून साताऱ्याला प्रवास (Toll Plaza) करणार असाल तर तुम्हला आता जादा पैसे द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे.

ही टोलदर वाढ टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड व (Toll Plaza)महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार दरवर्षी केली जात असते. यंदा देखील ही दर वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आनेवाडी टोलनाक्यावरून ये-जा करताना आता वाहनधारकांना जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी खेड शिवापुर टोलनाक्यावर देखील टोलमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती होती आता आणेवाडी आणि खेड शिवापूर या दोन्ही टोलनाक्याच्या टोल दरामध्ये मध्ये वाढ करण्यात आली आहे. शिवाय दोन्ही टोल नाक्यावर एक एप्रिल पासून नव्या दर वाढिने टोल आकारला जाणार आहे.

काय असेल नवा दर ?(Toll Plaza)

कार जीप व्हॅन किंवा हलक्या मोटर वाहनांकडून एका बाजूच्या प्रवासाकरिता ८० रुपये टोल आकारला जाणार आहे. तर हलके व्यवसायिक वाहन किंवा मिनी बससाठी 135 रुपये बस किंवा ट्रक साठी 280 रुपये जड बांधकाम मशनरी किंवा मल्टी एक्सेल वाहनांसाठी 435 रुपये तर मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी 530 रुपये टोल आकारला (Toll Plaza) जाणार आहे. टोल नाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना मासिक पास साठी 340 रुपये आता मोजावे लागणार आहेत.

यामुळे पुणे मुंबईहून विकेंड साठी बाहेर फिरायला जाणाऱ्या(Toll Plaza) प्रवाशांना सातारा महाबळेश्वर या ठिकाणी जाताना आता जादा पैसे द्यावे लागणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या पर्यटकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.