Tomato Benefits : तुम्हाला टोमॅटो खायला आवडत नाही? फायदे जाणून घ्याल तर रोज खाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tomato Benefits) घराघरातील स्वयंपाकात वापरला जाणारा टोमॅटो हा रंगाने इतका आकर्षक असतो की तो खाण्याचा मोह बऱ्याच जणांना आवरत नाही. पण काही लोक अशीही असतात ज्यांना डाळीत टोमॅटोचं साधं साल जरी दिसलं तरीही नाक मुरडतात. बऱ्याच लोकांना टोमॅटो आणि टोमॅटोपासून बनलेले पदार्थ खायला अजिबात आवडत नाहीत. अशा प्रत्येकासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे.

टोमॅटोकडे नुसतं बघून तोंड वाकडं करणाऱ्या प्रत्येकाला ही बातमी वाचल्यानंतर टोमॅटो न खाण्याचा पश्चाताप होईल. कारण टोमॅटोमध्ये असणारी पोषक तत्व आरोग्याच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची आणि फायदेशीर असतात की तुम्हाला मोठमोठ्या आजारांपासून सुटका देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटोतील पोषक तत्व आणि टोमॅटो खाण्याचे फायदे.

टोमॅटोमध्ये कोणकोणती पोषक तत्वे आढळतात?

टोमॅटो हे असं फळ आहे ज्याचा वापर भाजी, सॉस, ग्रेव्ही, आमटी, सांबर आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती बनवण्यासाठी केला जातो. मात्र, टोमॅटो फक्त पाककृती बनवण्यापुरता मर्यादित नसून आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड फायदेशीर असे फळ आहे. टोमॅटोमध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. (Tomato Benefits)

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, फॉलेट, कॅल्शियम यासह अँटिऑक्सिडंट, लायकोपिन, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम आणि सोडियम देखील टोमॅटोमध्ये आढळते. यामुळे अशा विविध पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेला टोमॅटो हा शरीराची काळजी घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

टोमॅटो खाल्ल्याने होणारे फायदे (Tomato Benefits)

1) रोगप्रतिकारशक्ती वाढते

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, लायकोपिन आणि बीटा कॅरोटीन सारखी पोषक तत्व असतात. ही पोषक तत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात टोमॅटोचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दी खोकल्यासारखे संसर्ग तुमच्या आसपासही येत नाहीत.

2) स्नायूंची काळजी घेण्यासाठी फायदेशीर

(Tomato Benefits) टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि सोडियम ही पोषक तत्व पुरेशा प्रमाणात असतात. ही तत्व आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाईटचे काम करतात. त्यामुळे टोमॅटोचे नियमित सेवन केल्यास ही पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात आणि यामुळे आपल्या शरीरातील स्नायू मजबूत राहतात. शिवाय त्यांची झीज होणे थांबते. त्यामुळे स्नायूंच्या मजबुतीसाठी टोमॅटो खाणे फायदेशीर ठरते.

3) हाडं मजबूत राहतात

टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतात. शिवाय टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. ज्यामुळे आपले दात आणि हाडं मजबूत राहतात.

4) रक्तदाबावर नियंत्रण राहते

टोमॅटोचे नियमित सेवन करणे विविध प्रकारे शरीरासाठी फायदेशीर ठरते. (Tomato Benefits) कारण टोमॅटोमध्ये लायकोपिन, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ईसारखे अनेक कॅरोटीनाईड समाविष्ट असतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. म्हणूनच टोमॅटोचे सेवन करणे रक्तदाबाची समस्या असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

5) वजन कमी होते

टोमॅटोमध्ये फायबरचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. फायबरचे सेवन केल्याने आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. परिणामी आपल्या दैनंदिन आहारात बाहेरच्या पदार्थांचे सेवन टाळता येते. ज्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण करणे सोपे जाते. इतकेच नाही तर टोमॅटोमध्ये असणारे फायबरचे गुणधर्म हे आतडे देखील निरोगी ठेवतात. (Tomato Benefits)