Top 5 Hill Stations In Maharashtra : ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 हिलस्टेशन्स; ज्यांच्या सौंदर्याला तोड नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top 5 Hill Stations In Maharashtra) राज्यभरात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे घामाच्या नुसत्या धारा निघू लागल्या आहेत. जो तो गरमीने हैराण होत आहे. अशा दिवसात गप्प घरात पंखे, कुलर, एसी लावून बसावं असं वाटण साहजिक आहे. पण उन्हाळयाच्या दिवसात लहान मुलांना सुट्ट्या असतात. त्यामुळे नाईलाजाने म्हणा किंवा इतर कोणत्या कारणाने उन्हाळ्यात एखादी शॉर्ट पिकनिक तरी करावीच लागते.

अशावेळी शांत, निवांत आणि मुख्य म्हणजे हवेशीर जागेचा पर्याय मिळाला तर? तुम्हीसुद्धा अगदी उद्या मारत सुट्ट्या एन्जॉय कराल. असेच काही मस्त सुखद गारवा आणि विश्रांतीचे विलक्षण क्षण देतील अशा ५ हिलस्टेशनची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर वेळ ना घालवता याविषयी जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर आणि थंड अशी 5 हिलस्टेशन
(Top 5 Hill Stations In Maharashtra)

1. महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. या ठिकाणी अनेक लोक अगदी विकेंड ट्रीपसाठी देखील येतात. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे गरमीच्या दिवसात या ठिकाणाला भेट देणे फारच आल्हाददायी वाटते. इथली मनमोहक दृश्य, डोंगरी भाग आणि थंडगार शुद्ध हवा कायम पर्यटकांना आकर्षित करते. शिवाय प्राचीन मंदिरं, घनदाट जंगल, छोटे मोठे धबधबे, डोंगर आणि दऱ्यादेखील लक्षवेधी ठरतात.

2. पाचगणी

महाबळेश्वरपासून जवळ असणाऱ्या पाचगणी या हिलस्टेशनची तर बातच न्यारी. (Top 5 Hill Stations In Maharashtra) सह्याद्री पर्वताच्या ५ टेकड्यांमुळे महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला पाचगणी असे नाव पडले. हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असून इथली हिरवळ, धुकं, थंडगार वारे आणि उंच पर्वत रांगा मनाला भुरळ घालतात. त्यामुळे शॉर्ट ट्रिप असो वा मोठी सुट्टी इथे वेळ घालवायला मजा येते.

3. चिखलदरा

चिखलदरा हे हिलस्टेशन कुणालाही स्वतःकडे आकर्षित करू शकते. सुंदर तलाव, नयनरम्य निसर्ग, हिरवी झाडी आणि मुख्य म्हणजे इथले कॉफीचे मळे यांना तोड नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील या सुंदर हिलस्टेशनला एकदा तरी नक्की भेट द्या. इथला निसर्ग आणि हवेतील गारवा कायमच पर्यटकांच्या मनाला थंडावा देतो.

4. इगतपुरी

मुंबईपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर असलेले इगतपुरी हे एक अत्यंत सुंदर असे हिल स्टेशन आहे. (Top 5 Hill Stations In Maharashtra) येथील दृश्य इतर कोणत्याही हिलस्टेशनपेक्षा अधिक मनमोहक आहेत. कारण हा ट्रेकर्सचा अड्डा झालाय. जुने किल्ले, भव्य धबधबे आणि उंच पर्वतरांगा यांसह रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेकिंगसाठी हे ठिकाण फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे ट्रेकिंगचा विषय निघाला की इगतपुरीच्या चर्चा होतेच.

5. माथेरान

सह्याद्रीच्या रांगेत बसलेले माथेरान एक छोटेसे मात्र अत्यंत सुंदर असे हिल स्टेशन आहे. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेले हे हिलस्टेशन एक्स्प्लोअर करायला अनेक पर्यटक येत असतात. हिरवी गर्द झाली, लहान मोठे धबधबे आणि प्रेक्षणीय परिसर मनाला आनंद देतात. शिवाय माथेरानमध्ये तोय ट्रेनने प्रवास करण्याची मजा काही वेगळीच आहे. त्यामुळे एकदा तरी या ठिकाणी जरूर जा. (Top 5 Hill Stations In Maharashtra)