2025 च्या आर्थिक नियोजनासाठी टॉप ELSS म्युच्युअल फंड्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष उजडायला काहीच दिवस राहिले असून, 2025 नववर्ष सुरु होण्याआधीच अनेकांची आर्थिक नियोजने ( Financial planning ) सुरु झाली आहेत. त्यामुळे नवीन वर्षात आर्थिक नियोजनाला गती मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक स्वावलंबन आणि कर बचतीसाठी गुंतवणुकीच्या योग्य पर्यायांचा वापर करून , जास्त नफा कमावणे गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) म्युच्युअल फंड समोर आला आहे. हा कमी लॉक-इन कालावधी आणि आकर्षक नफ्यामुळे ELSS फंड हे करदात्यांमध्ये जास्त लोकप्रिय होत आहेत. तर चला जाणून घेऊयात याची सविस्तर माहिती.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स –

ELSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स ( equity-linked savings scheme ) होय . हे असे म्युच्युअल फंड आहेत, जे गुंतवणुकीच्या 80 % रक्कम शेअर बाजारात गुंतवतात. ELSS हा एकमेव म्युच्युअल फंडचा प्रकार असून, जो आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलत प्रदान करतो. यामध्ये गुंतवणुकीसाठी तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असून हा सर्वात कमी कालावधी आहे.

कर सवलत मिळते –

ELSS मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास कर सवलत मिळते, ज्यामुळे कर बचत करण्याचा एक उत्तम मार्ग मिळतो. यासोबतच शेअर बाजाराशी संबंधित असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगल्या नफ्याची शक्यता असते. शेअर बाजाराची वाढती प्रवृत्ती आणि संबंधित कंपन्यांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे ELSS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना खूप नफा मिळवता येतो. तसेच, ELSS चा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये लॉक-इन कालावधी असतो, जो गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यास मदत करतो आणि चुकता निर्णय घेण्यापासून रोखतो. यामुळे, दीर्घकालीन सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ELSS कडे पाहिले जाते.

टॉप ELSS फंड्स –

टॉप ELSS फंड्स मागील वर्षभरातील कामगिरीच्या आधारावर निवडले गेले आहेत. यामध्ये, SBI लाँग टर्म इक्विटी फंड 32.96% च्या परताव्यासह प्रमुख आहे. याच्या नंतर बँक ऑफ इंडिया ELSS टॅक्स सेव्हर फंड 27.73% आणि बडोदा BNP परिवा ELSS टॅक्स सेव्हर फंड 27.42% च्या परताव्यासह चांगला परफॉर्म करणारा आहे. DSP ELSS टॅक्स सेव्हर फंड देखील 27. 50% च्या परताव्यासह एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. या सर्व फंडांमध्ये HSBC ELSS टॅक्स सेव्हर फंड सर्वाधिक 38.80% चा परतावा देत आहे, जो त्याला या यादीत प्रमुख स्थान देतो. हे फंड्स मुदतीचे कर फायदे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श ठरू शकतात.