Top 5 Richest Area In Nashik : नाशिकचे हायप्रोफाईल हॉटस्पॉट! इथं राहतात कोटींचे बंगलेवाले, करोडपती शेतकरी, उद्योजक आणि राजकीय दिग्गज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Top 5 Richest Area In Nashik : नाशिक म्हणजे महाराष्ट्राची धार्मिक राजधानी, वाईनची नगरी आणि आता ‘हायप्रोफाईल लाइफस्टाइल’साठीही ओळखली जाणारी नगरी… नाशिक शहर केवळ तीर्थयात्रेपुरतेच सीमित राहिलेले नाही, तर आज ते एक स्मार्ट आणि श्रीमंतांचे शहर म्हणून नावारूपाला आले आहे. इथे लाखो रुपये कमावणारे शेतकरी, मोठे व्यापारी, राजकीय नेते आणि उद्योजक मोठ्या प्रमाणावर राहतात. नाशिकमध्ये असे काही परिसर आहेत जे केवळ श्रीमंतीसाठीच नव्हे, तर आधुनिक जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहेत. आज आपण नाशिकमधील अशाच TOP 5 (Top 5 Richest Area In Nashik) श्रीमंत आणि पॉश भागांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथं फक्त बंगले नाहीत, तर स्टेटसही विकत घेतलं जातं!

गंगापूर रोड (Top 5 Richest Area In Nashik)

गंगापूर रोड हा नाशिकमधील सर्वात प्रतिष्ठित परिसरांपैकी एक आहे. येथील रिअल इस्टेट किंमती आकाशाला भिडलेल्या आहेत. सुला वाईन्स, यॉर्क वाईनरीजसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या शेजारी हा परिसर स्थित आहे. अनेक हायएंड वाईन रिसॉर्ट्स, फार्महाऊसेस, आणि लक्झरी व्हिला यामुळे या परिसराचा ग्लॅमर वाढला आहे. श्रीमंत शेतकरी आणि वाईन उद्योगातील उद्योजक याच भागात वस्ती करताना दिसतात.

महात्मा नगर

महात्मा नगर म्हणजे नाशिकमधील पॉवर अ‍ॅड्रेस! येथे अनेक माजी आणि विद्यमान राजकारणी, सरकारी अधिकारी आणि व्यापारी राहत आहेत. उच्चभ्रू लोकांसाठी इथं सुसज्ज टॉवर्स, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊस, आणि मल्टिक्युझीन रेस्टॉरंट्स आहेत. इथं रहायचं म्हणजे समाजात एक वेगळाच स्टेटस!

इंदिरा नगर

पश्चिम नाशिकमधील इंदिरा नगर हा परिसर गेल्या काही वर्षांत हायएंड क्लासेसच्या पहिल्या पसंतीचा झाला आहे. शैक्षणिक संस्था, मोठे शॉपिंग मॉल्स, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि क्लीन रस्त्यांनी याची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठीही हा एक हॉटस्पॉट मानला जातो.

सोन्याने गाठला नवा उच्चांक; आजचे भाव इथे चेक करा

पाथर्डी फाटा

मुंबई-आग्रा महामार्गावर असलेला पाथर्डी फाटा झपाट्याने विकसित होणारा व्यापारी आणि निवासी हब आहे. मोठ्या हायवे कनेक्टिव्हिटीमुळे येथे अनेक नवे टाउनशिप प्रोजेक्ट्स, लॉजिस्टिक हब्स आणि वाणिज्यिक प्रॉपर्टीज उभारल्या जात आहेत. येथे राहणारे अनेक व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट बिझनेस करणारे कोटीपती आहेत.

गोविंद नगर

राष्ट्रीय महामार्ग 50 जवळ असलेला गोविंद नगर हा नाशिकचा एक सुंदर आणि शांत पॉश एरिया आहे. येथील झाडांनी भरलेले रस्ते, मॉडर्न अपार्टमेंट्स, आणि सुरक्षित वातावरणामुळे इथे अनेक उच्च उत्पन्न गटातील कुटुंबं वास्तव्यास आहेत. NRI नाशिककर याच भागात गुंतवणूक करतात.

नाशिक का बनतोय श्रीमंतांचा नवाका ‘हॉटस्पॉट’?

द्राक्ष आणि वाईन उद्योगातील भरभराट
स्मार्ट सिटी अंतर्गत झालेला इन्फ्रास्ट्रक्चर विकास
वाढत्या उद्योगांमुळे उत्पन्न वाढलेलं
मुंबई-पुणेच्या तुलनेत अजूनही परवडणाऱ्या दरात लक्झरी हाऊसिंग

नाशिकचा चेहरामोहरा आज केवळ धार्मिक नव्हे, तर शहरी आणि श्रीमंतीचा बनत (Top 5 Richest Area In Nashik) चालला आहे. आधुनिक सुखसोयी, वेगवान दळणवळण आणि भरभराटीची अर्थव्यवस्था यामुळे येत्या काळात नाशिक महाराष्ट्रातील सर्वात ‘हॉट रिअल इस्टेट डेस्टिनेशन’ म्हणून उदयाला येणार आहे.