Top Mutual Funds : ‘या’ म्युच्युअल फंड्सचे गुंतवणूकदार झाले मालामाल; फक्त 5 वर्षात मिळाले बंपर रिटर्न्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Mutual Funds) अलीकडच्या काळात आपला पैसा विविध योजनांमध्ये गुंतवून भविष्यासाठी आर्थिक निधी तयार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या चांगलीच वाढली आहे. लोकांना भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून गुंतवणूक महत्वाची आहे हे पुरते कळून चुकले आहे. महत्वाचे असे की, दरम्यानच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा कल लक्षणीय स्वरूपात वाढल्याचे समोर आले आहे. कारण, म्युच्युअल फंडात जर तुम्ही योग्य मार्गाने पैसे गुंतवलेत तर निश्चित स्वरूपात तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यातही जर तुम्ही फोकस्ड कॅटेगरीमध्ये गुंतवणूक केलात तर चांगलेच मालामाल होऊ शकता. गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना याचा चांगला अनुभव आल्याचे समोर आले आहे.

‘फोकस्ड फंड’ म्हणजे काय? (Top Mutual Funds)

‘फोकस्ड फंड’ हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. जे काही विशिष्ट श्रेणींच्या शेअर्सपुरते मर्यादित आहेत. अशा प्रकारच्या म्युच्युअल फंड्सची किमान ६५% मालमत्ता इक्विटी आणि संबंधित उपक्रमांमध्ये ठेवणे बंधनकारक असते. यामध्ये काही प्रकार आहेत. ज्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. या फोकस्ड फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांना गेल्या ५ वर्षात सरासरी २२% ते १७% परतावा देण्यात आला आहे. म्हणजेच या फंड्सच्या माध्यमातून केवळ ५ वर्षात चांगला परतावा मिळाला आहे. हे फंड्स कोणते आहेत? याविषयी जाऊन घेऊ.

क्वांट फोकस्ड फंड

म्युच्युअल फंडातील क्वांट फोकस्ड फंडच्या गुंतवणुकदारांना गेल्या ५ वर्षांत सरासरी २२.०६% परतावा मिळाला आहे. (Top Mutual Funds) यानुसार कॅल्क्युलेशन केले असता समजते की, जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी या फंडात १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य २.७० लाख रुपये इतके असते. अर्थात दुप्पटीपेक्षाही अधिक लाभ मिळाला असता.

360 वन फोकस्ड इक्विटी फंड

360 वन फोकस्ड इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाने गेल्या ५ वर्षांत सरासरी २१.६६% परतावा दिला आहे. यानुसार कॅल्क्युलेशन केल्यावर लक्षात येते की, जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी या फंडात १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य सर्वसाधारणपणे २.६६ लाख रुपये इतके झाले असते.

ICICI प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंड

फोकस फंड्सपैकी ICICI प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या फंडात गेल्या ५ वर्षात सरासरी १९.५९% परतावा देण्यात आला आहे. (Top Mutual Funds) यानुसार कॅल्क्युलेशन केल्यास समजते की, या फंडात ५ वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती तर आता यामध्ये १ लाख रुपये वाढून २.४४ लाख रुपये इतके परताव्यात आले असते.

HDFC फोकस्ड 30 फंड

फोकस फंड्सच्या HDFC फोकस्ड 30 फंडने गेल्या ५ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी १९.१४% परतावा दिला आहे. यानुसार कॅल्क्युलेशन करून लक्षात येईल की, गेल्या ५ वर्षापूर्वी या फंडात गुंतवलेली १ लाख रुपयांची रक्कम सरासरी पाहता लाखभराने वाढून २.४० लाख रुपये इतकी झाली आहे.

फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड

फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडमध्ये ५ वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाने सरासरी १८.३६% इतका परतावा दिला आहे. (Top Mutual Funds) यानुसार जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी या फंदात १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे २.३२ लाख रुपये परतावा स्वरूप आले असते.

सुंदरम फोकस्ड फंड

सुंदरम फोकस्ड फंड या म्युच्युअल फंडात ५ वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना सरासरी १७.८९% परतावा देण्यात आला आहे. यानुसार, गुंतवणूक केलेल्या रकमेत साधारण १ लाख रुपये वाढल्याने आत्ताच्या घडीला २.२७ लाख रुपये इतका परतावा आला असेल. (Top Mutual Funds)