Top Mutual Funds : ‘या’ म्युच्युअल फंड्सने दिले बंपर रिटर्न्स; गुंतवणूकदार झाले मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Mutual Funds) गेल्या काही वर्षांमध्ये स्टॉक मार्केटने चांगला जोर धरला आहे. ज्याचा परिणाम BSE आणि NSE मार्फत थेट म्युच्युअल फंड्सवर होतो आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र आणला जातो आणि या निधीचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात. सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसते. अशावेळी सामान्य गुंतवणूक धारकासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो.

दरम्यान, गेल्या एका वर्षात म्युच्युअल फंडने एकदम जोरदार कामगिरी बजावली आहे. सेक्टोरल, स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंड्सने गुंतवणूकदारांना फक्त एका वर्षात ५० ते ९४ टक्के इतका रिटर्न दिला आहे. शिवाय गेल्या वर्षभरात भारतीय शेअर बाजारातदेखील तेजीचे सत्र दिसून आले. (Top Mutual Funds) ज्यामुळे म्युच्युअल फंडातून गुंतवणूकदारांना मोठ्या कमाईची संधी मिळाली. दरम्यान या एका वर्षात अनेक म्युच्युअल फंड्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करून खुश केले आहे.

यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना फक्त एका वर्षात बंपर परतावा मिळाला आहे. या क्षेत्रातील फंडने केवळ एका वर्षात ९७ टक्क्यांचा परतावा दिल्याने गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस पडलाय असे म्हटले तर अतिशयोक्ती वाटणार नाही. चला तर जाणून घेऊयात हे म्युच्युअल फंड्स कोणते आहेत? ते खालीलप्रमाणे:-

PSU म्युच्युअल फंड्स (Top Mutual Funds)

PSU म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना ९४.१० टक्के इतका जबरदस्त परतावा देण्यात आला आहे. दरम्यान, आदित्य बिर्ला सन लाईफ पीएसयू इक्विटी फंडने ९६ टक्के तर एसबीआय पीएसयू फंडने ९२ टक्के रिटर्न्स दिले आहेत.

इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड्स

गेल्या एका वर्षात PSU फंड्सप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड्सची कामगिरीदेखील चांगली होती. इन्फ्रा म्युच्युअल फंड्सच्या माध्यामातून ग्राहकांना एकूण ५८ टक्क्यांचा परतावा देण्यात आला आहे. (Top Mutual Funds) दरम्यान, एचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंड्सच्या माध्यमातून ७९.३७ टक्के रिटर्न ग्राहकांना देण्यात आले. तर निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंडने ७३.६६ टक्के रिटर्न्स दिले आहेत.

फार्मा म्युच्युअल फंड्स

गेल्या एका वर्षात इतर क्षेत्रांच्या जोडीने औषधीशास्त्र क्षेत्राने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात फार्मा म्युच्युअल फंड्स या कॅटेगरीमध्ये ग्राहकांना सरासरी ५५.९९ टक्के परतावा मिळाला आहे. (Top Mutual Funds) यामध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल फार्मा हेल्थकेअर अँड डायग्नॉस्टिक फंडने (ICICI Prudential Pharma Healthcare And Diagnostic Fund) एकूण ६२.७३ टक्के इतका परतावा दिला आहे. मुख्य म्हणजे हा फंड या श्रेणीतील सर्वाधिक कमाई करून देणारा ठरला आहे.

स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्स

इतर फंड्सच्या शर्यतीत स्मॉल आणि मिडकॅप म्युच्युअल फंड्सनेसुद्धा गेल्या वर्षभरात ग्राहकांना चांगली कमाई करून दिली आहे. या श्रेणीत सरासरी ५३.५६ टक्के इतका परतावा मिळाला आहे. तर मिडकॅप कॅटेगिरीत सरासरी ५०.६७ टक्के इतका परतावा मिळाला आहे. (Top Mutual Funds)