Tourism India : रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत फिरायला जायला कुणाला आवडत नाही. सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे तिथली संस्कृती जाणून घेणे , म्हणजे अनेकांचा छंद असतो. दररोजची मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि आपल्या कुटुंबा सोबत क्वालीटी टाइम घालवण्यासाठी एक सही ट्रिप तो बनती है..! भारतात फिरायला जाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. आजच्या लेखात आपण अशाच काही ठिकाणांची (Tourism India) माहिती करून घेणार आहोत. चला तर मग एका सुंदर सफरीला …
वृंदावन (Tourism India)
यमुना नदीच्या काठावर वसलेले सर्वात जुने शहर म्हणजे वृंदावन. बालपणी जिथे कृष्ण राहिला ते ठिकाण म्हणजे वृंदावन समजले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी हे शहर म्हणजे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे हे ठिकाण पवित्र स्थान मानले जाते, म्हणून लोक येथे एक क्वालिटी टाइम घालवण्यासाठी आणि काही शांततापूर्ण क्षण घालवण्यासाठी आवर्जून जातात.
लखनऊ
लखनौ म्हणजे उत्तर प्रदेशची राजधानी आणि सर्वात मोठे शहर. गोमती नदीच्या (Tourism India) काठावर वसलेले नवाब आणि कबाबांचे शहर म्हणून लखनऊ प्रसिद्ध आहे. याशिवाय हे ठिकाण स्थापत्य, इतिहास, साहित्य आणि संस्कृतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तुम्ही फूड लव्हर असाल तर या ठिकाणी आवश्य भेट द्या . लखनऊ कबाब आणि बिर्याणीची दुकाने, लखनवी चिकन मार्केट आणि घाऊक दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे ऑथेंटिक लखनवी व्यंजनांचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही कुटुंबासह या ठिकाणी भेट देऊ शकता आणि काही आनंदाचे क्षण एकत्र घालवू शकता.
अयोध्या
अयोध्या म्हणजे प्रभू रामाचे जन्मस्थान, उत्तर प्रदेशातील सरयू नदीच्या (Tourism India) काठावर अयोध्या वसलेले आहे आणि हिंदूंच्या सात पवित्र शहरांपैकी हे एक शहर आहे. आत तर आयोध्येत मोठे राम मंदिर बांधले आहे त्यामुळे या मंदिराला भेटी देण्यासाठी लोकांची रीघ लागते. अयोध्या हे जैन धर्माच्या 24 पैकी चार तीर्थंकरांचे जन्मस्थान आहे, त्यामुळे जैन धर्माच्या अनुयायांसाठी देखील हे एक महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवू शकता.
ताजमहाल
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील निस्सीम प्रेमाचे प्रतीक ‘ताजमहाल’ हे पाहण्यासारखे (Tourism India) महत्त्वाचे ठिकाण आह. ताजमहाल ही जगप्रसिद्ध वास्तू असून देशविदेशातील लोक येथे भेटी देण्यासाठी येत असतात. हे आग्रा सरयू नदीच्या काठी वसलेले आहे. आग्रा हे इतिहास प्रेमी, वास्तुकला प्रेमी आणि खाद्यप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे जाऊ शकता, चांगले फोटो घेऊ शकता आणि शांततेचे क्षण घालवू शकता.