Tourism : सोलो ट्रिप करायचीय ? मग ‘या’ ठिकाणांना भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tourism : वेगवेगळे प्रदेश पाहणे, फिरणे कुणाला आवडत नाही. आपण आपल्या कुटुंबासोबत बऱ्याचदा फिरायला जात असतो. मात्र तुम्ही कधी सोलो ट्रिप वर गेलाय का ? महिलांना सोलो ट्रिप वर जायचं म्हण्टलं एक ना अनेक शंका कुशंका मनात येतात. याचं सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षितता. पण आज आपण अशा काही ठिकणांबद्दल (Tourism) सांगणार आहोत जी ठिकाणे सोलो ट्रिप साठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरतील.

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड म्हटलं की सुंदर बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर तलाव प्रसिद्ध आहेत. पण स्वित्झर्लंड कमी गुन्हेगारी दर, शांत वातावरण आणि उत्तम सार्वजनिक सेवा येथे मिळतात. कमी गुन्हेगारी दर, शांत (Tourism) वातावरण आणि सार्वजनिक सेवा हे एकट्या महिला प्रवाशांसाठी उत्तम ठिकाण बनवतात. अल्पाइन लँडस्केप, सुंदर बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर तलाव यासाठी प्रसिद्ध आहे. हा देश जागतिक शांतता निर्देशांकात सहाव्या क्रमांकावर आहे, ज्यामुळे तो महिलांसाठी सुरक्षित मानला जातो. आपण येथे हायकिंग आणि स्कीइंग सारखे साहसी खेळ खेळू शकता.

आइसलँड (Tourism)

या देशाला बर्फ आणि आगीचा देश म्हणूनही ओळखले जाते. अनेक सुंदर हिमनद्या आणि ज्वालामुखी येथे पाहायला मिळतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, हा देश महिलांसाठी एकट्याने सहलीसाठी अधिक चांगला पर्याय आहे. येथे तुम्ही ब्लू लगून आणि गोल्डन सर्कलसारख्या ठिकाणांच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. सप्टेंबर ते मार्च या काळात नॉर्दर्न लाइट्सही (Tourism) येथे पाहता येतात. जागतिक शांतता निर्देशांकात या देशाला पहिले स्थान मिळाले आहे.

भूतान

भूतान हा अतिशय शांतता प्रिय देश मानला जातो. येथे तुम्ही बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर मठांना भेट देऊ शकता. पर्वतांनी वेढलेले असल्याने येथे अनेक सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. याशिवाय तुम्ही ट्रेकिंगसारख्या उपक्रमांचाही (Tourism) आनंद घेऊ शकता.

पोर्तुगल

जागतिक शांतता निर्देशांकात सातवे स्थान मिळविणारा हा देश महिलांसाठी अतिशय सुरक्षित मानला जातो. येथे तुम्ही अनेक समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स आवडत असतील तर हे ठिकाण (Tourism) तुमच्यासाठी योग्य आहे.

फिनलँड

सांताक्लॉज व्हिलेजपासून ते नॉर्दर्न लाइट्स पाहण्यापर्यंत अनेक रोमांचक अनुभव तुम्ही घेऊ शकता. येथे तुम्ही अनेक सुंदर तलाव, मध्यरात्रीचा सूर्य, सौना इत्यादींचा आनंद घेऊ शकता. सौंदर्यासोबतच हा देश अतिशय सुरक्षितही (Tourism) मानला जातो.