Tourist Places In India : चाळीशी ओलांडायच्या आधी एकदा तरी अनुभवा निसर्गाचे थ्रिल ; भेट द्या ‘या’ ठिकाणांना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tourist Places In India : भटकायला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला अनेकांना आवडते. पण काही लोक असे असतात जे विचार करतात की आयुष्यात नोकरी संपल्यानंतर किंवा पुरेसा बँक बॅलेन्स , किंवा आयुष्यात सर्व सेटल झाल्यानंतर फिरायला (Tourist Places In India) जाऊ पण जर एका ट्रॅव्हलर च्या हिशोबाने पाहिले तर ‘अभि नाही तो कभी नही’ वयाची चाळीशी ओलांडण्याच्या आत तुम्ही निसर्गातलं थ्रिल अनुभवायला हवंच …! हो आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणचा निसर्ग तुम्हाला अनुभवायचा असेल तर वयाची चाळीशी ओलांडण्याच्या आधी आवश्य या ठिकाणांना भेट द्या. चला तर मग जाणून घेऊया अशी ठिकाण कोणती आहेत ?

ऋषिकेश

निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे सुंदर ठिकाण म्हणजे ऋषिकेश. दुसऱ्या एका कारणासाठी ऋषिकेश प्रसिद्ध आहे. ते म्हणजे साहसी खेळांसाठी. बंजी जम्पिंग, रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग यासारखे थरारक आणि साहसी खेळांचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.

स्कुबा डायव्हिंग (Tourist Places In India)

समुद्राच्या पोटातली अद्भुत दुनिया अनुभवायची असेल तर स्कुबा डायव्हिंग एकदा जरूर करा. महाराष्ट्राच्या (Tourist Places In India) बाबतीत बोलायचं झाल्यास मालवण ,सिंधुदुर्ग हे उत्तम ठिकाण आहे. जिथे स्कुबाचा थरारक अनुभववू शकता.

लेह लडाख

हे सर्वात साहसी पर्यटनस्थळ आहे. जगभरातील पर्यटकांची लेह लाडखला भेट देण्याची इच्छा असते. लेहमध्ये (Tourist Places In India)सामान्यपेक्षा आॅक्सीजन कमी आहे आणि वर चढल्यावर ती आणखी कमी होऊ लागते.

सांधण व्हॅली

आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातील ‘सांधण व्हॅली’चा दुसरा क्रमांक लागतो. या दरीतून जाणारी चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही. याठिकाणाला भेट देणे (Tourist Places In India) म्हणजे एक रोमांचकारी अनुभव नक्की मिळेल यात शंका नाही.

हरिहर (Tourist Places In India)

महाराष्ट्राला गड किल्ल्यांचे राज्य म्हंटले जाते. गड किल्ले सर करणे (Tourist Places In India) अनेकांचे पॅशन आहे. हरिहर हा किल्ला म्हणजे ट्रेकर्स साठी एखाद्या चॅलेंज पेक्षा कमी नाही. हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला आहे. लोक जीव धोक्यात घालून येथे ट्रेकिंग करतात. 90 अशांवर चढाई करताना डोळे गरगरतात हे इथलं आव्हान आहे.