TRAI Rule : आजच्या युगात मोबाइल फोन ही एक मूलभूत गरज बनली आहे. त्याशिवाय काही तासही काढणे कठीण झाले आहे. परंतु, मोबाइलने आपले खर्चही वाढवले आहेत. रिचार्ज प्लॅन महाग झाल्यामुळे वारंवार रिचार्ज करणे खर्चिक ठरते. अनेकजण रिचार्ज संपल्यानंतर लगेच नवीन प्लॅन घेतात, कारण त्यांना वाटते की नंबर बंद होईल. परंतु, सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी TRAI ने (TRAI Rule) काही नवीन नियम लागू केले आहेत, जे मोबाइल युजर्ससाठी मोठा दिलासा ठरले आहेत.
सिम कार्ड किती दिवस सक्रिय राहते?
जर तुम्ही सिम कार्ड रिचार्ज न करता ठेवले, तरी ते किती दिवस सक्रिय राहू शकते, याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे लोक घाईघाईने रिचार्ज करून घेतात. TRAI च्या नव्या नियमांमुळे आता सिम कार्ड रिचार्ज न करताही काही काळ सक्रिय ठेवता येते.
जिओ सिमसाठी नियम
जर तुम्ही जिओ सिम वापरत असाल, तर ते 90 दिवसांपर्यंत रिचार्ज न करता सक्रिय राहते. मात्र, 90 दिवसांनंतर तुम्हाला रिअॅक्टिव्हेशन प्लॅन घ्यावा लागेल. रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल्सची सुविधा वेगवेगळ्या युजर्ससाठी वेगवेगळी असते. काहीजणांच्या नंबरवर एक महिना इनकमिंग चालू राहते, तर काहीजणांना एक आठवडा किंवा एक दिवसच सुविधा मिळते. जर तुम्ही 90 दिवसांपर्यंत कोणतीही अॅक्टिव्हिटी केली नाही, तर तुमचा नंबर पूर्णपणे बंद केला जाईल आणि तो दुसऱ्याला दिला जाईल.
एअरटेल सिमसाठी नियम
एअरटेल सिम कार्ड 60 दिवसांपर्यंत रिचार्ज न करता सक्रिय राहते. त्यानंतर तुम्हाला 45 रुपयांचा व्हॅलिडिटी प्लॅन घ्यावा लागतो.
Vi सिमसाठी नियम
Vi सिम कार्ड 90 दिवसांपर्यंत रिचार्ज न करता सक्रिय राहते. त्यानंतर तुम्हाला सिम सक्रिय ठेवण्यासाठी 49 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल.
BSNL सिमसाठी नियम (TRAI Rule)
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सिम कार्डसाठी सर्वाधिक 180 दिवसांची वैधता देते. म्हणजेच रिचार्ज न करता 180 दिवसांपर्यंत तुमचा नंबर सक्रिय राहतो.
TRAI च्या नव्या नियमांचा लाभ
TRAI च्या या नव्या नियमांमुळे युजर्सना आता सतत रिचार्ज करण्याची गरज नाही. विशेषतः ज्यांच्याकडे दोन सिम कार्ड्स आहेत, त्यांना या नियमांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.