भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. म्हणूनच भारतीय रेल्वेला लाइफलाइन देखील म्हटले जाते. विशेषतः सण उत्सवांच्या काळात तसेच सलग सुट्टीच्या काळात रेल्वेला खूप गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून अतिरिक्त गाड्यांची सोय सुद्धा केली जाते. अशा वेळी अनेकदा तिकीट कन्फर्म झाले की नाही हे काळत नाही. मात्र आजच्या लेखात आम्ही तुम्हाला रेल्वे तिकिटांवर असलेल्या एका कोड विषयी सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या तिकीटाची स्थिती नेमकी काय आहे ? हे कळू शकते. चला तर मग जाणून घेऊया …
रेल्वेच्या तिकिटावर RLWL,PQWL,GNWL,TQWL असे काही कोड लिहिलेले असतात. जर तुम्ही घेतलेले तिकीट निरखून आणि लक्ष पूर्वक पहिले तर तुम्हाला हे कोड अगदी सहज दिसू शकतील. या प्रत्येक कोडचा एक अर्थ असतो. यावरून तुमचे तिकीट कन्फर्म आहे किंवा नाही ? तुमच्या तिकीटाची स्थिती समजू शकते.
कोड आणि त्याचे अर्थ
- जर तुमच्यावर तिकिटावर RLWL (रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट) लिहिलेले असेल, तर तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
- तुमच्या वेटिंग तिकिटावर PQWL (पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट) लिहिलेले असेल, तर तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते.
- त्याच वेळी, जर तुमच्या तिकिटावर GNWL (जनरल वेटिंग लिस्ट) लिहिलेले असेल तर याचा अर्थ तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
- त्याचप्रमाणे, जर तुमच्या तिकिटावर TQWL (तत्काळ कोटा वेटिंग लिस्ट) लिहिलेले असेल, तर तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.