Travel : अनुभवा महाराष्ट्रातल्या ‘Dark Forest’ मधला थरार; भेट द्या ‘या’ ठिकाणाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : ‘Dark Forest’ असं नाव जरी घेतलं तरी लगेचच आपल्या नजरेसमोर अमेझॉनची जंगलं येतील मात्र तुम्हाला माहितीये का ? आपल्या महाराष्ट्रात हो आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ‘Dark Forest’ आहे जिथे दिवसा सूर्याची किरणे पोहचत नाहीत. जंगल म्हणजे काय ? तिथला थ्रिल अनुभवायचा असेल तर महाराष्ट्रातल्या या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहिजे. ok आता तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही… तर आम्ही बोलत (Travel) आहोत महाराष्ट्रातलं Dark Forest म्हणजेच आडराई जंगलबद्दल …

हे जंगल म्हणजे खूप प्राचीन असं वर्षा वन. (rainforest) हे ठिकाण थोडंसं अलिप्त असं आहे. इथे जायचे असेल तर अनेक ट्रेकिंग ग्रुप्स येथे ट्रेकिंगचे नियोजन करतात. त्यामुळे तुम्ही येथे ट्रेकर्सच्या ग्रुप सोबत जाऊ शकता. ट्रेक करताना कधी डोंगर दऱ्या, कधी शेतवड , कधी नदी, ओढे पार करावे (Travel) लागतात.

पाच पठारांचा समावेश (Travel)

आडराई जंगल ट्रेकमध्ये पाच पठारांचा समावेश आहे जो हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखराच्या मागे पसरलेला आहे. प्रत्येक पठाराचे स्वतःचे स्थानिक नाव आहे, परंतु एकत्रितपणे ते आडराई जंगल म्हणून ओळखले जातात. पवित्र आडराई जंगल ट्रेकचा ताजेपणा अनुभवा, जिथे अनेक वर्षे जुने असलेले वर्षावन आहे. अगदी आपल्या अस्तित्वाच्या खूप आधीपासून. हे निर्जन नंदनवन बाहेरील जगापासून अलिप्त आहे, जे तुम्हाला (Travel) खरोखरच डिस्कनेक्ट आणि निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होऊ देते.

कसे जाल? (Travel)

आडराई जंगल हे पुण्यापासून जवळ असलेल्या जुन्नर येथील माळशेज घाटात असलेलं जंगल आहे. तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर जुन्नर मार्गच आणि माळशेज घाटाच्या अगोदरच असलेलं खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून जंगलात जायला ट्रेक सुरू करावा. आणि जर का तुम्हाला मुंबईहून यायचं असेल आणि स्वतःच्या वाहनातून यायचं असल्यास माळशेज घाट ओलांडून खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून तुम्ही ट्रेक सुरू करू शकता. शिवाय मुंबईवरून कल्याण मार्गे नगरला जाणाऱ्या बस ने तुम्ही खुबी फाट्यावर उतरू शकता खुबी फाट्यावरून खिरेश्वर (Travel) गावातून हा ट्रेक सुरू होतो.

औषधी वनस्पतींचा खजिना

दाट अशी वनराई किर्रगर्द झाडी जबरदस्त वेगळा अनुभव असेल तर अडराई जंगल ट्रेक नक्की करावा. विशेष म्हणजे याच जंगलात महाराष्ट्रातला प्रसिद्ध असा काळु धबधबा देखील आहे. उंचावरून पडणारा हा जलप्रपात अतिशय मनमोहक आणि सुंदर दिसतो यात काही शंकाच नाही या जंगलाचं वैशिष्ट्य म्हणजे आडराई या रावांना हे घनदाट जंगल ओळखले जातात या जंगलात सूर्यप्रकाशही फारसा (Travel) पोहोचत नाही त्यामुळे झाडांची दाट अशी दाटी-वाटी येथे बघायला मिळते. शिवाय इथे तुम्हाला असंख्य अशा औषधी वनस्पती बघायला मिळतील.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथे जाणं थोडं अवघड आहे मात्र थोडा पाऊस कमी झाल्यानंतर तुम्ही इथे जर ट्रेकला जाणार असाल तर तुम्हाला असंख्य असे वेगवेगळे छुपे धबधबे सुद्धा इथे पाहायला मिळतील. येताना तुम्ही खिरेश्वर परिसरातील प्राचीन आणि ऐतिहासिक नागेश्वर मंदीरालाही भेट देऊ शकता. त्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला थ्री एक्सपीरियंस करायचा असेल तर या ठिकाणी नक्की ट्रेक (Travel) करा.