Travel : सध्या उकाड्याचे दिवस संपून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. देशासह राज्यातल्या अनेक भागात पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही गर्मीला कंटाळला असाल तर आत्ताचा मौसम तुम्हाला फिरण्यासाठी खूप आल्हाददायक असेल. आज अशा काही ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी ठिकाणे जून महिन्यात फिरण्यासाठी उत्तम असतील. चला तर मग जाणून घेऊया…
हेमकुंड (उत्तराखंड ) Travel
केवळ थंड हवेचे ठिकाण म्हणून हेमकुंड प्रसिद्ध नाही तर हे एक तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जून महिन्यामध्ये इथं कमाल तापमान हे दहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते. त्यामुळे जर तुम्ही उघड्यामुळे हैराण झाला असाल तर हा स्पॉट तुमच्यासाठी पिकनिक (Travel) करण्यासाठी तसेच एक धार्मिक श्रद्धास्थान म्हणून सुद्धा उत्तम ठरेल. हे ठिकाण हिमालयाच्या कुशीत वसलेलं असून साहेब गुरुद्वारा म्हणजेच शिखांचं तीर्थस्थान इथे प्रसिद्ध आहे.
हेमकुंड हा एक संस्कृत शब्द असून हे म्हणजेच बर्फ आणि कुंड म्हणजेच कटोरा. इथे सुंदर तलाव देखील आहे शिवाय केवळ वर्षातील पाच महिने हे ठिकाण दर्शनासाठी खुले असते. इथे जाण्याचा मार्ग हा मनोहरी दृष्टीने परिपूर्ण आहे. शिवाय इथे रस्ता देखील बर्फाने झाकला जातो. तुम्ही येथे भेट (Travel) देणार असाल तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा की इथं जाण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता तुम्हाला पायीच पार करावा लागतो.
तवांग (अरुणाचल प्रदेश ) (Travel)
ईशान्यकडील हा प्रदेश असा आहे जिथे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. जून ही महिन्यात मात्र पर्यटकांची या भागात सर्वाधिक गर्दी होत असते. भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन पैकी हे एक ठिकाण आहे. इथला डोंगराळ आणि शांत प्रदेश तुम्हाला मन प्रसन्न करण्यासाठी पुरेसा आहे. हिवाळ्यात इथे बर्फ पडतो. जसं काश्मीरला स्वर्गाचा प्रदेश म्हटला जातो. थंड हवेचे ठिकाण (Travel) पाहायची तुमची इच्छा असेल तर हा ऑप्शन उत्तम आहे.