Travel : भीमाशंकरवर ‘या’ तारखेपर्यंत पर्यटनासाठी बंदी ; अपघात टाळण्यासाठी उचलले पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : पावसाळा सुरु झाला की डोंगर, दऱ्या, धबधब्यांनी भरलेल्या अनेक प्रेक्षणीय ठिकाणांना गर्दी होत असते. त्यातही धबधब्यांना भेट देणाऱ्यांची संख्या आधीक असते. कारण केवळ पावसाळ्यातच हे धबधबे प्रवाहित होत असतात. मात्र अनेकजण अशा ठिकाणी भेटी देत असताना जीवाची परवा न करता विचित्र धाडस करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे विपरीत घटनांना सामोरे जावे लागते. मागच्या दोन तीन दिवसात लोणावळा येथील भुशी डॅम ची दुर्घटना तसेच ताम्हिणी घाट येथील दुर्घटना ही ताजी उदाहरणे आहेत. म्हणूनच भीमाशंकर देवस्थान दर्शन आणि वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना देण्यास बंदी घातली आहे. ही बंदी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. म्हणजेच पूर्ण पावसाळा असेपर्यंत ही बंदी (Travel) असणार आहे. असे माहिती उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे.

भीमाशंकर हे ठिकाण उंच डोंगरदर्‍यात असलेलं ठिकाण आहे. पावसाळ्यात इथं येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही शिवाय पावसाळ्यात पाऊस जास्त असल्यामुळे इथली वाटाही निसरड्या होत असतात. या वाटांवर अपघात होण्याचा धोका जास्त आहे आणि हाच धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागतर्फे एक जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत बायोडाटा पर्यटनासाठी बंद (Travel) करण्यात आले आहेत.

भीमाशंकर येथील अप्रतिम असा निसर्ग सौंदर्य आणि धबधबे पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि भावीक इथे भेटी देत असतात. मात्र ज्या ठिकाणी असणाऱ्या धबधबे आणि कुंडांमधील पाण्याचा अंदाज पर्यटकांना घेता येत नाही त्यामुळे वाहून जाण्याची शक्यता असते म्हणूनच कोंडवळ धबधब्याला जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. चोंडीचा धबधबा, खोपिवली क्षेत्र, नाणीचा धबधबा, पदरवाडी जवळ सुभेदार धबधबा, नारिवली क्षेत्र घोंगड घाट नाला, खांडस ते भीमाशंकर मार्ग शिडी घाट पदरवाडी ते काठेवाडी हे सर्व बंद (Travel) करण्यात आले आहेत.

…अन्यथा कारवाई (Travel)

याबाबत माहिती देताना उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे यांनी सांगितले की. सध्या धबधबांच्या ठिकाणी प्रचंड पाऊस होत. आहे अपघाताचा धोका वाढल्यानं आम्ही धबधबे बंद करत आहोत ताम्हिणी घटासह भीमाशंकर अभयारण्य देखील बंद केले आहे. त्या ठिकाणीअवैधरित्या कोणी गेले तर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल अशी माहिती तुषार चव्हाण यांनी दिली आहे.

तरुण वाहून गेला… (Travel)

दरम्यान सोमवारी ताम्हिणी घाटामध्ये असलेल्या धबधब्यामध्ये एक तरुण उडी घेत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र हा तरुण वाहून गेल्यामुळे त्याला वाचवता आले नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे भीमाशंकर येथे पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे.