Travel : परदेश दौरा करायचाय ? भारतातील अशी रेल्वे स्थानकं जिथून पायीच जाऊ शकता परदेशात, जाणून घ्या

travel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : ट्रॅव्हल लव्हर्सना भटकंती करायला खूप आवडते. विकेंड, सुट्टीच्या दिवशी अनेकजण आपल्या कुटुंबासह पर्यटन स्थळांना जात असतात. मग त्यासाठी ट्रेन बुकिंग , हॉटेल या सगळ्याची तयारी आधीच सुरु होते. त्यातही सध्या परदेशात फिरायला जाण्याची क्रेझ आहे. पण त्यासाठी खर्चही खूप येतो. पण आजच्या लेखात आम्ही काही अशा ठिकांणाबद्दल सांगणार आहोत जेथील रेल्वे स्टेशन वरून चक्कं तुम्ही पायी पायी परदेशात (Travel) जाऊ शकता.

पायी सीमा ओलांडू शकता (Travel)

आपल्याला माहितीच असेल भारताची सीमा एकूण 7 देशांशी सामायिक आहे, परंतु काही शेजारी देश आहेत जिथे ट्रेनने प्रवास करणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. तुम्ही कोणत्या स्टेशनवर उतरून परदेशी सहलीला जाऊ शकता याची अचूक माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचा परदेश दौरा अधिक सुलभ होईल.

हल्दीबारी रेल्वे स्टेशन (Travel)

बांगलादेशात जायचे असेल तर हल्दीबारी रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. येथून बांगलादेशची सीमा 4.5 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही इथे पायीही जाऊ शकता. याशिवाय टॅक्सी, बस आदी सुविधाही उपलब्ध आहेत. मिताली एक्सप्रेसनेही तुम्ही बांगलादेशला (Travel) जाऊ शकता. ही ट्रेन न्यू जलपाईगुडी जंक्शन मार्गे ढाक्याकडे चालवली जाते आणि हल्दीबारी येथे थांबते.

पेट्रापोल रेल्वे स्टेशन (Travel)

याशिवाय बांगलादेशला जाण्यासाठी तुम्ही पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना येथे असलेल्या पेट्रापोल रेल्वे स्टेशनवर जाऊ शकता. येथून बंधन एक्सप्रेस चालवली जाते.

सिंगाबाद रेल्वे स्टेशन

बांगलादेशात जाण्यासाठी, तुम्ही पश्चिम बंगालमधील मालदा येथे असलेल्या सिंगाबाद रेल्वे स्टेशनवर उतरू शकता, जे भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक देखील मानले जाते. येथून खाली उतरल्यानंतर पायीच भारतीय सीमा ओलांडून परदेशात (Travel) प्रवेश करता येतो.

राधिकापूर रेल्वे स्टेशन

पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूरमध्ये असलेल्या राधिकापूर रेल्वे स्टेशनबद्दल तुम्ही ऐकले असेलच. हे झिरो पॉइंट रेल्वे स्थानक आहे, जे मालवाहतुकीसाठी महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. ते भारत आणि बांगलादेशच्या सीमेला जोडते.

जयनगर रेल्वे स्टेशन (Travel)

जर तुम्ही नेपाळला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात असलेल्या जयनगर रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल. नेपाळ येथून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे ते जनकपूरच्या कुर्था स्टेशनला जोडलेले आहे. पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय या देशात प्रवास करता येतो.